मी जेव्हा नव्याने ब्लॉगिंग शिकण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा सुरुवातीला मला लिखाणात काही अडचणी आल्या त्या संदर्भातील काही माहिती नवीन ब्लॉगर्ससाठी.
नवख्या लेखकाला सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागतो उदाहरणार्थ . लेखनासाठी विषय न सुचणे, विषय सुचलाच तर लिखाणाचे रिसर्च साहित्य कसे मिळवावे, रफ ड्राफ्ट बऱ्याच वेळा एडिट करावा लागतो हे सगळं करुन झाल्यानंतर एखादी ब्लॉग पोस्ट तयार होते, लेखकाला लिहिताना सामोरं जाव्या लागणाऱ्या अडचणींपैकी एक अडचण म्हणजे \” रायटर्स ब्लॉक\” ( हे माझं वैयक्तिक मत आहे ) . रायटर्स ब्लॉक हा एक असा प्रकार आहे जिथे लेखकाला \” लिहिण्यासाठी कोणता विषय निवडावा ? \” इथेच अडचण येते, किंवा लिहिण्यासाठीची जी विशिष्ठ शब्दरचना अथवा वाक्यरचना असते ती सुचत नाही. लेखकाला ‘ रायटर्स ब्लॉक ‘ ला सामोरं जावं लागण्यामागची काही कारणे आहेत ती आगोदर आपण समजून घेऊ आणि मग नंतर ब्लॉक कसा टाळता येऊ शकेल यावर बोलू.
1. लिहिताना अथवा लिहून झाल्यावर आपल्या लेखाची, अथवा लेखनशैलीची तुलना ही एखाद्या वेल एस्टॅबलिश्ड रायटरशी ( प्रस्थापित लेखकांशी ) केली जाते ज्यामुळे नवशिक्या लेखकाचे मनोबल खच्ची होण्याची शक्यता असते, गरजेचं नाही की ही तुलना त्रयस्थ व्यक्तींकडून होऊ शकते, काहीवेळा ही तूलना ही स्वतःकडून ही होऊ शकते.
2. सेकंडली, मोटिव्हेशन प्लेज इम्पॉर्टंट रोल इन , लेखकाचे मनोबल खच्ची होण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे त्यासाठीच मोटिव्हेशन गरजेचं आहे, मोटिव्हेशनची कमतरता ही इंटर्नल किंवा एक्सटर्नल असू शकते . त्यामुळेच लिखाणासाठी दोन्ही बाजूने मोटिव्हेशन गरजेचंच आहे.
इंटरनल मोटिवेशन वाढविण्यासाठी रोजचे लिखाणाचे शेड्यूल सेट करणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे, रोजच्या रोज काहीतरी लिहायची सवय लावून घेणे हा एक उत्तम पर्याय आहे, म्हणजे अगदी काहीही नाही लिहायचंय, पण एखाद्या गोष्टीबद्दल अथवा एखाद्या विषयाबद्दल निदान 5 -10 ओळी तरी लिहा त्यामुळे तुम्हाला लिहायची सवय लागेल, नंतर ओळींची संख्या वाढवा पराग्राफ लिहायला शिका, त्यानंतर पॅरेग्राफची संख्या वाढवत न्या, याच पद्धतीने तुमची एखादी छानशी पोस्ट अथवा लेख तयार होईल जो तुम्हाला रोज लिहिण्यासाठी मोटिवेशन देईल(असा माझा वैयक्तिक अनुभव आहे) .
या व्यतिरिक्त आपणाला “रायटर्स ब्लॉक” बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास गुगलवर बरीच माहिती उपलब्ध आहे.
– ऋषिकेश
Image Source : Pixabay
Good tips given by you !Jayashree Raut
LikeLike
Thank you !
LikeLike
Nice 👌Padmaja
LikeLike
Nice 👌Padmaja
LikeLike
Thank you .
LikeLike
Thank you .
LikeLike
Very nice.
LikeLike
Thank you
LikeLike
Very good post
LikeLike
Thank you !
LikeLike
Nice sharing!Instagram link not working
LikeLike
Thank you ! , The link is Active, the content of link will be shown to you only if you are an instagram user.
LikeLike
छान…
LikeLike
धन्यवाद 👍
LikeLike