सन 1999-2000 सालापासून भारतात इंटरनेटचा वापर वाढीस लागला ज्याचा अनेक इंडस्ट्रीजना आजतागायत फायदा होत आलेला आहे. सिनेमॅटिक इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आलंय असं म्हणतात, स्पीड वाढणाऱ्या इंटरनेटच्या या 4 जी, 5 जी च्या जमान्यात अनेक व्यवहार ऑनलाइन होतायत. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातली माहिती इंटरनेटवर अगद सहजरीत्या उपलब्ध होते, त्यामुळे शिक्षण असो, नोकरी असो अथवा कोणत्याही इंडस्ट्रीचा बिझनेस असो यांची माहिती एका क्लीकवर कोणत्याही वेबसाइटवर क्षणार्धात उपलब्ध होते, त्याचबरोबरीने कम्युनिकेशन आणि मीडिया यांची तरुणाईत बऱ्याच प्रमाणात क्रेझ आढळून येते, या मिडियातलाच एक प्रकार म्हणजे बिंज वॉच. अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, झी फाईव्ह ई. बिंज वॉचला प्रोमोट करणारे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आज उपलब्ध असून, मोबाईल, टॅबलेट, डेस्कटॉप अथवा स्मार्ट टीव्हीवर बिंजवॉचिंग करण्याची क्रेझ आजकालच्या तरुणाईत मोठ्याप्रमाणावर आढळून येते. एका टॅपवर आपल्या आवडत्या मालिकांचे एकामागून एक एपिसोड्स आपल्याला पाहायला मिळणे म्हणजे सध्याच्या पिढीसाठी एक पर्वणीच आहे यालाच बिंज वॉच म्हणले जाते, फक्त मालिकाच नाही तर आपल्या आवडीचे चित्रपट, अॅनिमेटेडपट जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी सहजरित्या पहायला उपलब्ध होतात, ऑनलाईन असो अथवा ऑफलाईन असो बिंजवॉचिंग मिडीया हा टिव्हीला एक पर्याय म्हणून आज उपलब्ध झालेला आहे. आमची म्हणजे 90 ज् ची पिढी ही शनिवारची सकाळची शाळा बुडवून दूरदर्शनवर शक्तिमान बघता बघता लहानाची मोठी झाली आहे (निदान माझा तरी हाच अनुभव आहे), त्यामुळे नेक्स्ट जनरेशनला \” आमच्या बालपणी नव्हतं काही असलं \”, असंही म्हणायला चान्स आहे. परंतु ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे टेलिव्हिजनचा इंपॅक्ट काहीसा कमी झाल्यासारखा वाटत आहे, त्यामुळे फॅमिलीसोबत बसून शेवटचा चित्रपट कोणता बघितला असा प्रश्न आजच्या तरुणाईला विचारल्यास संबंधित व्यक्ती गोंधळात पडण्याची शक्यता जास्त आहे असं माझं मत आहे, हाच प्रश्न मला विचारल्यास माझं उत्तर तयार आहे मी शेवटचा फॅमिलीसोबत बसून बघितलेला चित्रपट म्हणजे \” देऊळ \”, ही फिलिंग नोस्टलजिक करते पण कधी कधी. तर असो तो एक वेगळा विषय आहे. नेटफ्लिक्स अथवा अमेझॉनसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात एंटरटेनमेंट त्याचबरोबरीने इन्फोटेनमेंट मालिका उपलब्ध आहेत. एका मिडलक्लास व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे सब्स्क्रिप्शन प्लॅन्स आणि बॅक टू बॅक बघण्यासाठी उपलब्ध होणारा सिनेमॅटिक अथवा सिरीज कंटेंट, थोडेफार फॅमिली शोज यामुळे फक्त तरुणाईच नाही तर नोकरदार वर्गही टेलिव्हिजन शोजना एक पर्याय म्हणून बिंज वॉचिंगकडे पहात आहे. साधारणतः 2012-13 सालापासून भारतात बिंज वॉच चा प्रकार अस्तित्वात आहे. एवढंच काय तर आपण भारतीय लोक बिंज वॉचिंगमध्ये जगात आघाडीवर आहोत, एका सर्वेच्या रीपोर्टनुसार भारतीय व्यक्ती सरासरी आठवड्यातून 8 तास बिंज वॉचिंग करतो. बिंज वॉच चे बरेच फायदे आहेत, जसं की बऱ्याच नवनवीन विषयांच्या मालिका बघण्यास मिळतात ज्यातल्या बऱ्याचश्या मालिका ज्ञानात भर पडणाऱ्या असतात, पण कधी कधी प्रश्न पडतो की \” हे घडू शकतं?\”, तर कधी कधी चकित व्हायला होतं की \” हे ही घडू शकतं \”. मित्रांच्या टोळक्यात बिंज वॉच सिरिजवर भरभरून चर्चा होतात, गेम ऑफ थ्रोन्स, ब्रेकिंग बॅड, आणि तत्सम आशा अनेक सिरिज सोशल सर्कल मध्ये चर्चेचा विषय बनतात मग पुढे काय घडेल?, काय घडलं पाहिजे?, कसं घडलं पाहिजे?, कुठे घडलं पाहिजे? इथपर्यंत जाऊन चर्चा धडकतात, खरं सांगायचं झालं तर थोड्याफारप्रमाणात ती एक मजा पण असते. परंतु बिंज वॉच चे फायदे आहेत म्हणल्यावर तोटेही असणारच, जर आपण केवळ मनोरंजन अथवा करमणूक म्हणून कोणतीही मालिका पाहत असाल तर ठीकच आहे परंतु बिंज वॉचिंग जर तुम्हाला ठराविक कालावधी नंतर सोशली आईसोलेटेड बनवत असेल तर जाणून घ्या की ब्रेक घायची वेळ झाली आहे, काही वेळेस बिंज वॉच तुमच्या झोपेवरही परिणाम करू शकतं, त्यामुळे आपल्या हिशोबाने आपल्या प्रकृतीवर कोणताही ताण न येऊ देता, बिंज वॉचचा आनंद घेतल्यास तो अधिक आनंददायी ठरतो असं माझं मत आहे. आठवड्यातून अथवा महिन्यातून लॉकडाऊन असो वा नसो कुटुंबासमावेत एखादा चित्रपट पाहवाच या मताचा मी आहे, सहज शेयर करावासा वाटला म्हणून या वेळेस हा विषय, बाकी जाता जाता एवढंच, हॅव अ सेफ, डिलाईटफूल बिंजवॉचिंग.
लेख आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद.
-© ऋषिकेश पंचवाडकर.
Nice informative write up!
LikeLike
Thank you ! 👍
LikeLike