साधारणतः 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मी राहायला डोंबिवलीत होतो, तसा मुंबईसाठी मी नवीनच होतो पण मला सोलापूरातून डोंबिवलीत शिफ्ट होऊन वर्ष उलटून गेलं होतं, डोंबिवलीत मी बऱ्यापैकी रुळलो होतो थोडफार स्वतःपुरतं कामवायला लागलो होतो. दरम्यान कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पेपर असल्याने सोलापूरचा एक मित्र फ्लॅटवर राहायला आला होता. मुंबई तशी त्याला नवीन नव्हती परंतु कुठेतरी भटकायला जायचं म्हणून आम्ही एकेदिवशी मारिन लाईन्स, एके दिवशी जुहू बीच, बँडस्टँड, एके दिवशी वरळी सी लिंक या मुंबईतल्या प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. ठरल्याप्रमाणे रविवारी मित्र त्याच्या पेपरला जाऊन आला, मी ही माझ्या कामावर जाऊन आलो त्यानंतर प्लॅन ठरला तो माथेरानला जायचा. डोंबिवली पासून साधारणतः 35 किमी अंतरावर असलेला माथेरान हिल स्टेशन हा पिकनिक स्पॉट, पावसाळ्याचे दिवस होते त्या दिवशी पाऊस म्हणावा असा पडला नव्हता, तरी अधूनमधून ये जा करतच होता, आमचा तिथे जायचा सीझन चुकीचा होता(हे आम्हाला तिथे पोहोचल्यावर समजलं) तरीही आम्ही काहीही करुन जायचंच असं ठरवलं होतं, तर ठरल्याप्रमाणे आम्ही दुपारी 12:45 च्या सुमारास निघालो. रस्ता नवीन होता त्यामुळे एकदा वाट चुकलोच आणि ते फेअर पण होतं. रस्त्यावर ट्रॅफिकही तसं तुरळकच होतं. आम्ही माथेरानचा घाट चढत होतो तिथवर पोहोचायलाच आम्हाला जवळपास 2 – 2:30 वाजले ऑलरेडी सूर्यही माथ्यावर आलेला होता परंतु डोंगररांगांच्या सानिध्यात शिरताच सूर्याची दाहकता कमी जाणवायला लागली. माथेरानच्या हद्दीत शिरताच घाट अर्धअधिक चढून झाल्यावर आम्ही पहिला कार्यक्रम केला तो फोटोग्राफीचा सहाजिकच पहिल्यांदा भेट देणाऱ्या कुठंल्याही पर्यटकाला मोहवून टाकणारं निसर्गसौंदर्य माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असल्याने आमच्यासारख्या तरुणाईला फोटोग्राफीचा मोह हा होणारच, तसंच आम्हालाही फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही, तिथून पुढे जवळपास तासभर यथेच्छ फोटोग्राफी करुन झाल्यावर आम्ही उर्वरित घाट चढण्यास प्रारंभ केला. आम्हाला घाट पूर्णपणे चढून जायलाच साधारण 3 वाजले. अत्यंत नागमोडी वळणाचा घाट चढून जाताना यांच्या दोघांचीही दमछाक झाली, माथेरानचा घाट तसा आवघड आहे खासकरून जेव्हा तुम्ही तू व्हिलरवरून प्रवास करत असता, गंमत म्हणजे घाट चढताना दोघांपैकी एकाला गाडीवरून उतरून चालत यावं लागलं, तर कधी दोघांना उतरुन गाडी ढकलत न्यायची वेळ आली. आजूबाजूला बघायचं तर फक्त डोंगर आणि घनदाट झाडी आणि नीरव शांतता, शांतता काय असते ही एकदा तिथे जाऊन अनुभवायलाच हवी ( असं माझं मत आहे) कारण मी ती शांतता अनुभवली आहे, रोजच्या हेक्टीक शेडयूल मधून वेळ काढून एकांत आणि शांतता अनुभवायची असल्यास माथेरानसारखा ऑप्शन नाही. आपल्या महाराष्ट्र टुरिझमनेही माथेरानला महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम पिकनिक स्पॉट म्हणून बऱ्यापैकी प्रोमोट केले आहे. तर, आम्ही रमत-गमत, टवाळक्या करत, कधी महत्वाचे तर कधी बिनकामाचे विषय चघळत कसेबसे माथेरानच्या एट्रंसपाशी पोहोचलो, गाडी पार्क करायला अजिबात जागा नव्हती कारण विकेंड असल्याने गर्दी भरपूर होती. कशीबशी गाडी पार्क करून जी काही एट्रंस फी होती टी भरून आम्ही त्या गर्द वानराईत प्रवेश केला, विविध प्रकारचे पक्षी, घोडे यांच्या दृश्याने माथेरानमध्ये आमचं स्वागत झालं. माथेरानमध्ये फिरण्यासाठी घोडेस्वारीही करायची सोय असते परंतु आम्ही आऊट ऑफ बजेट होतो त्यामुळे पायीच चालत निघालो. माझ्या मित्राबद्दल माहीत नाही पण माझ्यासाठी माथेरान फारच नवीन होतं. मोहवून टकणारं ते निसर्ग सौंदर्य, ती पोषक शांतता, आणि धुक्यात हरवलेल्या डोंगररांगा सगळंच झकास होतं. पावसाळा असल्याने माथेरानची राणी महणून ओळख असणारी माथेरान मिनी ट्रेन बंद होती त्यामुळे हिलस्टेशनमध्ये प्रवेश केल्यापासून आम्ही आमचा प्रवास पायीच पार पडायचं ठरवलं. संथ गतीने मी आणि माझा मित्र त्या डोंगररांगांमधून चालत निघालो, आजूबाजूला बरिचशी छोटी मोठी हॉटेल्स असल्याने गजबज होतीच त्यामुळे तिथे अगदीच काही एकटेपण वगैरे जाणवायचा प्रश्न नव्हता, त्यातच माझ्या मित्राला मधूनच चहा प्यायची हुक्की आली त्यामुळे आम्ही चहा घ्यायला वाटेतील एका हॉटेलमध्ये थांबलो, असंही आम्ही बऱ्यापैकी चालत अंतर कापलेलं असल्याने पायाला थोडा विश्राम म्हणून आम्ही थोडा वेळ थांबायचं ठरवलं, चहा घेऊन झाल्यावरही आम्ही यथेच्छ फोटोग्राफीचा आनंद घेतला. पावसाळा असल्याने अधून मधून पाऊस येतच होता. पावसल्यामुळेच माथेरानमधील बरीचशी हॉटेल्स आणि स्पॉट्स हे बंदच होते, त्यामुळे आम्ही ठरवलं की जे स्पॉट चालू असतील त्यांनाच भेटी द्याय्चया.
तिथून पुढे फोटोग्राफी करता करताच आम्ही चालत होतो दुपारचे जवळपास 4 वाजले होते, आम्ही माथेरानमध्ये आत शिरत असताना बरीच तरुण तरुणींची टोळकी मेन एंट्रन्सच्या दिशेने परतत होती, बहुदा ते सकाळी लवकर आले असावेत असा अंदाज लावून आम्ही पुढे निघालो. माथेरानमध्ये आम्ही सगळ्यात आधी भेट दिली ती म्हणजे माथेरान मार्केटला, माथेरानच्या मार्केटमध्ये विकली जाणारी स्पेशल चिक्की, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू जसं की चामड्याची बॅग, पर्स, बूट इत्यादी, त्याशिवाय कोल्हापुरी चपला, वाळलेली रानफुले जी खाण्यासाठी अथवा डेकोरेशनसाठी वापरली जातात आणि माथेरानमध्ये बनवला जाणारा मध (लोकल हनी) ह्या सर्व वस्तू तुमच्या मनाला भुरळ पडल्याशिवाय राहात नाहीत. पण मार्केटमध्ये जास्त वेळ न दवडता आम्ही पुढचा स्पॉट पहायला निघालो करण थोड्याच वेळात सूर्य मावळतीला जाणार होता त्यामुळे पुढचे सगळे स्पॉट बघून आम्हाला संध्याकाळच्या आत मेन एंट्रन्सपाशी पोहोचायचं होतं, बरंच अंतर पायी कापल्यावर आम्ही एका तळ्यापाशी येऊन पोहोचलो त्या स्पॉटचं नाव \’शर्लोट लेक\’, माथेरान मार्केटपासून थोडं अंतर चालल्यावर लागणारा पहिला स्पॉट. पावसाळा चालू असल्यामुळे तळं बऱ्यापैकी भरलं होतं तिथे गर्दीही भरपूर होती तळ्यावर साधारणतः अर्धा तास मजामस्ती करून झाल्यावर 10-15 मिनिटं तिथेच विश्रांती घेतली, चालून चालून आम्ही बऱ्यापैकी थकलो होतो. पुढचा स्पॉट होता पॅनोरमा पॉईंट, याठिकाणी सूर्यास्त बघण्यासाठी बरीच गर्दी आधीपासूनच जमलेली होती. समोर धुक्याआड लपलेल्या हिरव्यागार डोंगररांगा आणि सोसाट्याचा वारा पॅनोरमा पॉइंटच्या शोभेत भर टाकत होत्या, माझा मित्र न थकता प्रत्येक पॉइंटवर पोझ दिल्या दिल्या जमेलतशी फिटोग्राफी करत होता. तिथून पुढे इको पॉईंट, सनसेट पॉईंटना भेटी देऊन आम्ही परत फिरलो सूर्य मावळतीला लागला होता, एवढं सगळं बघता बघता बरीच दमछाक झाली होती, टपरी चालवणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने आम्हाला आधीच सांगितलं होतं की माथेरान हे एक दिवसात पूर्णपणे बघून होत नाही बरेच लोक इथे 2 दिवसाच्या ट्रिपवर येतात पहिला दिवस अर्धे अधिक पॉईंट्स बघण्यात निघून जातात व दुसऱ्या दिवशी उर्वरित पॉइंट्सला लोक भेटी देतात, परंतु आमच्यावर वेळेचं आणि कामाचं बंधन असल्याने आम्ही मात्र माघारी निघण्याचा निर्णय घेतला. आम्ही झपाझप पावलं टाकत झालेला चिखल तुडवत परतीचा प्रवास करत होतो संध्याकाळचे 6 वाजले होते 6:30 च्या सुमारास आम्ही मेन गेट पाशी पोहोचलो चालून चालून बरेच थकलो होतो त्यामुळे परत चहा घेतला.
माथेरानचा घाट उतरताना मात्र आम्हाला गाडी चालू करायची गरजच भासली नाही उलटपक्षी ब्रेकचाच वापर जास्त करावा लागला, आम्ही वेगाने घाट उतरलो आणि रहदारी असणाऱ्या मेन हायवेला लागलो आणि मुंबईत आल्याची जाणीव झाली. उत्सुकतेपोटी मी एकदा मागे वळून बघितलंच, माथेरानचा डोंगर दिमाखात जसाच्या तसा उभा होता. एक प्रवासी म्हणून माथेरानचे बरेचसे स्पॉट बघायचे राहूनच गेले पावसाळा असल्यामुळे म्हणा किंवा वेळेची कमतरता असल्याने संपूर्ण माथेरान न फिरता आल्याची खंत होतीच, परंतु घाट उतरतानाच ठरवलं होतं की पुढच्या वेळेस यायचं कमीतकमी डझनभर टाळकी घेऊन यायचं आणि अख्खं माथेरान पालथं घालायचं, आता पूर्णपणे सूर्यास्त झाला होता. असो लेख फारच मोठ्ठा होतोय त्यामुळे मी थांबतो, पण जाता जाता एवढंच सांगू इच्छितो निसर्गप्रेमींना भुरळ पाडणाऱ्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, दगदगीच्या जीवनात एकांत शोधणाऱ्या, वीकेंडला उत्तम पर्याय असलेल्या माथेरानला ट्रेकर्स, ट्रॅव्हलर्सनी, हिंडायची फिरायची आवड असणाऱ्यांनी एकवार अवश्य भेट द्यावी, माथेरानबद्दल बरीच उपयुक्त माहिती हिंडणाऱ्यांसाठी गुगलवर उपलब्ध आहे. वेल देन ट्रॅव्हलर्स हिंडत रहा मजा करत रहा आयुष्य भरभरुन जगत रहा.
लेख आवडला असल्यास आपली प्रतिक्रिया कमेंट करुन नक्की कळवा
धन्यवाद.
– ©ऋषिकेश पंचवाडकर
साधारणतः 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मी राहायला डोंबिवलीत होतो, तसा मुंबईसाठी मी नवीनच होतो पण मला सोलापूरातून डोंबिवलीत शिफ्ट होऊन वर्ष उलटून गेलं होतं, डोंबिवलीत मी बऱ्यापैकी रुळलो होतो थोडफार स्वतःपुरतं कामवायला लागलो होतो. दरम्यान कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पेपर असल्याने सोलापूरचा एक मित्र फ्लॅटवर राहायला आला होता. मुंबई तशी त्याला नवीन नव्हती परंतु कुठेतरी भटकायला जायचं म्हणून आम्ही एकेदिवशी मारिन लाईन्स, एके दिवशी जुहू बीच, बँडस्टँड, एके दिवशी वरळी सी लिंक या मुंबईतल्या प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. ठरल्याप्रमाणे रविवारी मित्र त्याच्या पेपरला जाऊन आला, मी ही माझ्या कामावर जाऊन आलो त्यानंतर प्लॅन ठरला तो माथेरानला जायचा. डोंबिवली पासून साधारणतः 35 किमी अंतरावर असलेला माथेरान हिल स्टेशन हा पिकनिक स्पॉट, पावसाळ्याचे दिवस होते त्या दिवशी पाऊस म्हणावा असा पडला नव्हता, तरी अधूनमधून ये जा करतच होता, आमचा तिथे जायचा सीझन चुकीचा होता(हे आम्हाला तिथे पोहोचल्यावर समजलं) तरीही आम्ही काहीही करुन जायचंच असं ठरवलं होतं, तर ठरल्याप्रमाणे आम्ही दुपारी 12:45 च्या सुमारास निघालो. रस्ता नवीन होता त्यामुळे एकदा वाट चुकलोच आणि ते फेअर पण होतं. रस्त्यावर ट्रॅफिकही तसं तुरळकच होतं. आम्ही माथेरानचा घाट चढत होतो तिथवर पोहोचायलाच आम्हाला जवळपास 2 – 2:30 वाजले ऑलरेडी सूर्यही माथ्यावर आलेला होता परंतु डोंगररांगांच्या सानिध्यात शिरताच सूर्याची दाहकता कमी जाणवायला लागली. माथेरानच्या हद्दीत शिरताच घाट अर्धअधिक चढून झाल्यावर आम्ही पहिला कार्यक्रम केला तो फोटोग्राफीचा सहाजिकच पहिल्यांदा भेट देणाऱ्या कुठंल्याही पर्यटकाला मोहवून टाकणारं निसर्गसौंदर्य माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असल्याने आमच्यासारख्या तरुणाईला फोटोग्राफीचा मोह हा होणारच, तसंच आम्हालाही फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही, तिथून पुढे जवळपास तासभर यथेच्छ फोटोग्राफी करुन झाल्यावर आम्ही उर्वरित घाट चढण्यास प्रारंभ केला. आम्हाला घाट पूर्णपणे चढून जायलाच साधारण 3 वाजले. अत्यंत नागमोडी वळणाचा घाट चढून जाताना यांच्या दोघांचीही दमछाक झाली, माथेरानचा घाट तसा आवघड आहे खासकरून जेव्हा तुम्ही तू व्हिलरवरून प्रवास करत असता, गंमत म्हणजे घाट चढताना दोघांपैकी एकाला गाडीवरून उतरून चालत यावं लागलं, तर कधी दोघांना उतरुन गाडी ढकलत न्यायची वेळ आली. आजूबाजूला बघायचं तर फक्त डोंगर आणि घनदाट झाडी आणि नीरव शांतता, शांतता काय असते ही एकदा तिथे जाऊन अनुभवायलाच हवी ( असं माझं मत आहे) कारण मी ती शांतता अनुभवली आहे, रोजच्या हेक्टीक शेडयूल मधून वेळ काढून एकांत आणि शांतता अनुभवायची असल्यास माथेरानसारखा ऑप्शन नाही. आपल्या महाराष्ट्र टुरिझमनेही माथेरानला महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम पिकनिक स्पॉट म्हणून बऱ्यापैकी प्रोमोट केले आहे. तर, आम्ही रमत-गमत, टवाळक्या करत, कधी महत्वाचे तर कधी बिनकामाचे विषय चघळत कसेबसे माथेरानच्या एट्रंसपाशी पोहोचलो, गाडी पार्क करायला अजिबात जागा नव्हती कारण विकेंड असल्याने गर्दी भरपूर होती. कशीबशी गाडी पार्क करून जी काही एट्रंस फी होती टी भरून आम्ही त्या गर्द वानराईत प्रवेश केला, विविध प्रकारचे पक्षी, घोडे यांच्या दृश्याने माथेरानमध्ये आमचं स्वागत झालं. माथेरानमध्ये फिरण्यासाठी घोडेस्वारीही करायची सोय असते परंतु आम्ही आऊट ऑफ बजेट होतो त्यामुळे पायीच चालत निघालो. माझ्या मित्राबद्दल माहीत नाही पण माझ्यासाठी माथेरान फारच नवीन होतं. मोहवून टकणारं ते निसर्ग सौंदर्य, ती पोषक शांतता, आणि धुक्यात हरवलेल्या डोंगररांगा सगळंच झकास होतं. पावसाळा असल्याने माथेरानची राणी महणून ओळख असणारी माथेरान मिनी ट्रेन बंद होती त्यामुळे हिलस्टेशनमध्ये प्रवेश केल्यापासून आम्ही आमचा प्रवास पायीच पार पडायचं ठरवलं. संथ गतीने मी आणि माझा मित्र त्या डोंगररांगांमधून चालत निघालो, आजूबाजूला बरिचशी छोटी मोठी हॉटेल्स असल्याने गजबज होतीच त्यामुळे तिथे अगदीच काही एकटेपण वगैरे जाणवायचा प्रश्न नव्हता, त्यातच माझ्या मित्राला मधूनच चहा प्यायची हुक्की आली त्यामुळे आम्ही चहा घ्यायला वाटेतील एका हॉटेलमध्ये थांबलो, असंही आम्ही बऱ्यापैकी चालत अंतर कापलेलं असल्याने पायाला थोडा विश्राम म्हणून आम्ही थोडा वेळ थांबायचं ठरवलं, चहा घेऊन झाल्यावरही आम्ही यथेच्छ फोटोग्राफीचा आनंद घेतला. पावसाळा असल्याने अधून मधून पाऊस येतच होता. पावसल्यामुळेच माथेरानमधील बरीचशी हॉटेल्स आणि स्पॉट्स हे बंदच होते, त्यामुळे आम्ही ठरवलं की जे स्पॉट चालू असतील त्यांनाच भेटी द्याय्चया.
छान लेख!
LikeLike
अतिशय सुंदर प्रवास वर्णन👌👌
LikeLike
Uttam lihilela ahes lekh 👌👌
LikeLike
Thanks ! 👍👍
LikeLike
Thanks !👍👍
LikeLike
Thanks !👍👍
LikeLike
छान अभुभवकथन
LikeLike
Thanks Alot! 👍
LikeLike
छान लिहीले , आमची पण सफ़र घडवून आणली
LikeLike
Thank You ! 👍
LikeLike