भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

आपल्यापैकी बऱ्याच वाचकांनी ढीगाने क्राईम, थ्रीलर, सस्पेन्स कादंबऱ्या वाचल्या असतील. एखादी सस्पेन्सने भरलेली कादंबरी अथवा थ्रीलर चित्रपट बघताना बऱ्याचदा त्या कादंबरीच्या वाचनात अथवा चित्रपटात पूर्णपणे गुंग होऊन जाण्याचा अनुभव आयुष्यात घेणारी व्यक्ती क्वचितच आढळून येईल. सहाजिकच वाचक अथवा प्रेक्षक एखाद्या कलाकृतीत अथवा कादंबरीत स्वतःला झोकून देऊन रसग्रहण करतो त्यामागचं रहस्य म्हणजे त्या कथेतील केलेली पात्रांची दमदार मांडणी, मग ती पुस्तकातली गोष्ट असो वा चित्रपटातील. निरनिराळ्या कथांमधील अनेक काल्पनिक पात्रे आपण कादंबरीच्या अथवा चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवली असतीलच, व त्यातली काही पात्रे साहजिकच स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी मिळतीजुळती वाटणं ही गोष्ट साहजिकच आहे. मी सुद्धा एक वाचक आहे, थोडंफार वचन करण्याचा अथवा चित्रपट, सिरीज पाहण्याचा मी सुद्धा कधी कधी अनुभव घेतो. अश्याच मी वाचलेल्या आर्थर कॉनन डॉयल यांच्या एका पुस्तकातलं अथवा चित्रपटातलं मला भावलेलं काल्पनिक पात्र म्हणजे शेरलॉक होम्स. आपल्यापैकी बरेचसे वाचक या काल्पनिक पत्राशी परिचित असतीलच. शेरलॉक होम्स हा एक डिटेक्टिव (गुप्तहेर) आहे जो आपल्या अचाट बुद्धीचातुर्याने आणि गुन्हेगारी संबंधित विविध विषयांच्या कौशल्यांच्या आधारावर इंग्लंडच्या गुन्हेगारी जगतातील अनेक गुन्ह्यांचा शोध लावतो, कॉनन डॉयल यांनी शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रावर आधारित असलेली \” अ स्टडी ईन स्कार्लेट \” ही आपली पहिली कादंबरी सन 1887 साली प्रसिद्ध केली. युरोप खंडातील इंग्लंडमध्ये असलेल्या लंडन शहरात 221 बी बेकर्स स्ट्रीट वर राहाणारा शेरलॉक होम्स हा पेशाने स्वतःला सल्लागार म्हणून रिप्रेझेंट करतो त्याच बरोबरीने तो लंडनच्या पोलिस खात्याला म्हणजेच स्कॉटलंड यार्ड ला सुद्धा गुन्ह्यांचा तपास करण्यात अनेक वेळा मदत करतो. आपल्याकडे असलेल्या सूक्ष्म निरीक्षण आणि छोट्या छोट्या पुराव्यांच्या आधारे मोठमोठ्या गुन्ह्यांचा, घोटाळ्यांचा छडा  लावण्याची कुवत असलेल्या शेरलॉक होम्स या पात्राला वाचकांनी भरभरून रिस्पॉन्स दिला. 
शेरलॉक होम्सच्या कादंबरीतील अथवा प्रत्येक चित्रपटातील गोष्ट ही त्याचा सहकारी असलेल्या जॉन वॉटसन या पात्राच्या दृष्टिकोनातून सांगितली गेली आहे, शेरलॉकच्या जवळपास प्रत्येक केसेस मध्ये त्याला असिस्ट करणारा वॉटसन केसेस सॉलव्ह झाल्यानंतर त्यासंबंधीत टिपणे काढत असल्याचे शेरलॉक होम्सच्या गोष्टींमध्ये नमूद केले आहे. लष्करी सेवेतून निवृत्त झालेला जॉन वॉटसन होम्स बरोबरच त्याच्या बेकर्स स्ट्रीट मधील अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधे वास्तव्यास येतो. असे सांगितले जाते की शेरलॉक होम्स हे पात्र जोसेफ बेल या वास्तविक अस्तित्वात असंणाऱ्या व्यक्तीवरुन प्रेरित होऊन निर्माण केले गेले आहे. एडनबर्गच्या रॉयल इन्फोर्मरी येथे जोसेफ बेल हे सर्जन म्हणून काम करत होते, कॉनन डॉयल तिथे क्लार्क म्हणून काम करत असताना त्यांची जोसेफ बेल यांच्यासोबत भेट झाली, शेरलॉकप्रमाणेच छोट्या छोट्या निरीक्षणांवरुन मोठ्या निष्कर्षाप्रत पोहोचणे असा जोसेफ बेल यांचा स्वभाव होता, काही काळानंतर जोसेफ बेल यांनीच कॉनन डॉयल यांना पत्राद्वारे लिहून कळवले होते की \” आपण स्वतःच शेरलॉक होम्स आहात\”. त्याचप्रमाणे पेशाने पोलीस वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी असलेल्या सर्व लिटिल जॉन हे सुद्धा शेरलॉक हे पात्र निर्माण करण्यात प्रेरणा असल्याचे सांगितले जाते, त्यामुळेच कॉनन डॉयल यांना शेरलॉक होम्सच्या कथानकांमध्ये वैद्यकीय तपासणी आणि गुन्हा शोधणे यात समन्वय साधण्याची संधी दिसली.
त्याचबरोबर ब्रिटिश गव्हर्नमेंट मध्ये कार्यरत असलेला शेरलोकचा मोठ्ठा भाऊ मायक्रॉफ्ट होम्सचा उल्लेखही कॉनन डॉयल यांच्या कथांमध्ये आढळून येतो. मायक्रॉफ्ट होम्स \”ह्युमन डेटाबेस फॉर ऑल गव्हर्नमेंट पॉलिसीज\” नावाची सिव्हिल सर्व्हिस प्रोव्हाईड करत असतो. काही ठिकाणी स्वतः शेरलॉक होम्सही  काबुल करतो की मायक्रॉफ्ट होम्स हा त्याच्यापेक्षा हुशार आहे. लंडनमधील गुन्ह्यांचा यथायोग्यपणे, प्रभावीपणे शोध लावून देण्यात शेरलॉक होम्स स्वतःच्या थिअरीज अप्लाय करतो त्यातीलच त्याची एक थिअरी म्हणजे \” द सायन्स ऑफ डिडक्शन\” (अनुमानशास्त्र).  या अनुमनशास्त्राच्या आधारेच शेरलॉक अनेक गुन्ह्यांना न्याय मिळवून देतो. शेरलॉक हा माणूसघाणा आहे त्याचमुळे त्याचं त्याच्या घरमालकिणीशी म्हणजेच मिसेस हडसन यांच्याशी वादविवाद होत असतात, शेरलॉक च्या बऱ्याच कथांमध्ये याचा उल्लेखही आढळून येतो. परंतु मिसेस हडसन यांच्या पतीचे निधन झालेले असल्या कारणाने कधी कधी तो मिसेस हडसन यांच्याशी त्यांच्या मुलासारखा प्रेमळपणे वागतानाही दिसतो. शेरलॉक गुन्ह्यासंबंधित व्यक्तींवर पाळत ठेवण्यासाठी बेकर्स स्ट्रीटवरील मुलांची नेमणूक करतो त्यांना तो बेकर्स स्ट्रीट इररेग्युलर्स असे संबोधतो, या टोळीच्या म्होरक्याचे नाव विगिन्स आहे. शेरलॉकचा सहकारी जॉन वॉटसन बेकर्स स्ट्रीट वर राहायला येण्याआधी शेरलॉक सगळ्या केसेसचा तपास स्वतःच करीत असतो परंतु पुढील काळात घरभाडे परवडत नसल्याने तो दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट भाड्याने द्यायचं निश्चित करतो जिथे कालांतराने वॉटसन राहण्यास येतो. जवळपास 15 वर्ष शेरलॉक आणि वॉटसन बऱ्याच केसेसवर एकत्र काम करतात. त्याचबरोबर कथेला नायक आहे म्हणल्यावर त्याची नायिकासुद्धा असणारच, शेरलॉकच्या कथांमध्ये आयरीन अॅडलर ही शेरलॉकची प्रेयसी असते जी शेरलॉक सारखीच अत्यंत बुद्धिमान असून काही वेळेला ती शेरलॉकला ही मात देताना दिसते, जीच्याबद्दल शेरलॉक होम्स कायमच आदराने बोलत असतो. बाकी इतर स्त्रियांबद्दल शेरलॉकला फारसे स्वारस्य वाटत नाही.
 शेरलॉकच्या सवयींबद्दल बोलायचं झाल्यास त्याला पाईपमधून तंबाखू ओढण्याची सवय असते, काही वेळेला केसेस वर काम करत असताना मात्र तो हेवी ड्रग्स घेतो. स्वभावाने विक्षिप्त असलेला शेरलॉक होम्स हा निरनिराळ्या प्रकारातील तंबाखू आणि सिगारेटच्या रखेचा अभ्यास केल्याचा उल्लेख कथांमध्ये आढळतो. केवळ सिगारेटच्या राखेवरुन सिगरेटचा उत्पादक ओळखणारा शेरलॉक हा तलवारबाजीत आणि मुष्टियुद्धांतही प्रवीण आहे. शेरलॉकची स्वतःची अशी एक काम करण्याची पद्धत आहे जसं की,  गुन्ह्याच्या तपासावर काम करत असताना शेरलॉक तहान भूक विसरून आपली छोट्या पुराव्यांवरून त्याचे पृथक्करण करण्याचे कौशल्य पणाला लाऊन संबंधित व्यक्तिंनाच नव्हे तर वॉटसन आणि स्कॉटलंड यार्ड यांनाही चकित करुन टाकण्यात तरबेज आहे, तर कधी कधी तो रात्र रात्र व्हायोलिन वाजवण्यात व्यतीत करतो. तशी शेरलॉक होम्सला प्रसिद्धी फारशी आवडत नाही परंतु त्याला त्याच्या कौशल्याचे कौतुक केलेले फार आवडते. शेरलॉकच्या कथांमध्ये कधीतरी मधूनच शरलॉक आणि वॉटसन मध्ये खोलीच्या स्वच्छतेवरुन, खोलीत येणाऱ्या रासायनांच्या उग्र वसांवरून, तर कधी तपास करता करता निरपराध व्यक्तींना झालेल्या त्रासावरुन वादविवाद झाल्याची नोंद सापडते. स्टडी ईन स्कार्लेट नंतर \”द साईन ऑफ फोर \”, \”स्कॅन्डल ईन बोहेमिया\” पासून ते शेरलॉक होमसच्या गोष्टीच्या प्रवासाचा शेवट हा \”द फायनल प्रॉब्लेम\”  या गोष्टीवर येऊन थांबतो ज्यात शेरलॉकचा कट्टर शत्रू असलेल्या प्रोफेसर जीम मॉरियार्टी याच्यासोबत झालेल्या झटपटीत शेरलॉक आणि मॉरियार्टी ही रायसेनबाख या धबधब्याच्या कड्यावरून कोसळून मृत्युमुखी पडतात, परंतु यानंतरही वाचक असंतुष्टच राहिल्याने शेरलॉक \”रिटर्न्स ऑफ शेरलॉक होम्स\” च्या माध्यमातून परत येतो. पहिलं पर्व संपून दुसरं पर्व सुरू होईपर्यंत आठ ते दहा वर्षांचा कालावधी जातो, पुढील पर्वात शेरलॉकला जिवंत बघून वॉटसनला धक्का बसतो, परंतु शत्रूला चकवा देण्यासाठी मरण्याचे नाटक केल्याचे शरलॉक वॉटसनला सांगतो असा उल्लेख \” द अडवेंचर ऑफ द एम्पटी हाऊस\” या कथेत आढळतो. फायनल प्रॉब्लेम कथेवर एक पर्व संपवून दुसरं पर्व लिहिण्यामध्ये आठ वर्षांचा काळ लोटल्याने शेरलॉकच्या चाहत्यांनी या गॅपला “द ग्रेट हायॅटस” म्हणजेच शेरलॉक होम्सच्या अदृश्यतेचा काळ असे नाव दिले आहे.

 या नंतर कॉनन डॉयल यांनी प्रसिद्ध केलेली शेरलॉकची कथा म्हणजे \”द हाऊंड्स ऑफ बास्करविले\”. शेरलॉकच्या कथानकांमधील घडामोडी या सन 1900 ते 1927 या कालखंडात इंग्लंडमध्ये घडलेल्या दाखवलेल्या आहेत. शेरलॉक होम्स वर आधारित असलेल्या कथांची मालिका बीबीसी वर सन 2010 साली प्रसिद्ध झाली. गुन्हेगारी जगतातील अनेक गुन्ह्यांना आपल्या पृथक्करण (द सायन्स ऑफ डिडक्शन) या कौशल्याचा आधारे न्याय मिळवून देणारा शेरलॉक होम्स आणि त्याचा सहकारी जॉन वॉटसन ही जोडगोळी कोणताही सस्पेन्स अथवा क्राईम चित्रपट बघताना कायमच लक्षात रहाते.  
शेरलॉक होम्सबद्दल बरंच बोलण्यासारखं आहे परंतु लेख लांबलचक होण्याआधीच थांबतो, आपल्याला हा लेख आवडला असल्यास नावासकट शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करुन नक्की कळवा. 
धन्यवाद. 
– © ऋषिकेश पंचवाडकर 


Image Sourse: Pixabay Pixabay  pixabay
 
2 thoughts on “भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s