अमेझॉनचा वणवा । उन्नीस – बीस (19-20)

तसं 2020 हे वर्ष बऱ्यापैकी विचित्र आणि उद्योगधंद्यांसाठी थोडं नुकसानकारकच ठरलं, काही मोजक्या चांगल्या घडामोडी सोडल्या तर 2019 हे वर्ष जगासाठी फारसं काही परिणामकारक वगैरे ठरलं नाही. कोरोना हा अत्ता गेल्या सहा एक महिन्यांपासून ऍक्टिव्ह झालेला व्हायरस आहे, तसाच निपाह नावाचा 2019 मध्ये आलेला एक व्हायरस होताच पण तो कोव्हीड – १९ इतका परिणामकारक आणि नुकसानकारक ठरला नाही, असं थोडंफार का होईना 19-20 मध्ये साम्य आहेच.

स्पेसिफिकली भारतापुरतं बोलायचं झालं तर पुलवामा घटना ज्यात गेल्या वर्षी 39 जवान शहीद झाले, 370 कलम रद्द करणं अशा मिक्स्ड टाईप घडामोडींच 2019 हे वर्ष होतं. 2019 साली जगभरातही अनेक छोट्यामोठ्या चित्र विचित्र, आनंददायी, दुःखद घटना घडल्या, या जगभरातील घडामोडींकडे आपण एक कटाक्ष टाकल्यास जगात घडलेली 2019 सालची एक भयानक घटना म्हणजे भडकलेला अमेझॉनचा वणवा. ऑगस्ट सेकंड वीक ते जवळपास ऑक्टोबर संपेपर्यंत अमेझॉनचं जंगल पेटलं होतं. जगाच्या १०० % ऑक्सिजनपैकी दोन तृतीयांश म्हणजेच टू थर्ड 2/ 3 ऑफ द ऑक्सिजन हा अमेझॉनच्या जंगलातून जगाला मिळतो. अमेझॉनच्या जंगलातील उष्ण ऋतूत पेटलेला हा वणवा ब्राझील, पेरू, पराग्वे, आणि बोलिव्हिया देशांपर्यंत पोहोचला. जनरली उष्णतेच्या अथवा उन्हाळ्यात म्हणू आपण अमेझॉन च्या जंगलात खाणकाम, शेती, लाकुडतोडी या गोष्टींसाठी डिफॉरेस्टशन करण्यात येतं, जंगलात वृक्षतोड करून वणवे पेटवणे आणि त्याठिकाणची जमीन कसण्यासाठी अथवा खोदकामासाठी वापरणे याला डिफॉरेस्टेशन म्हणतात. प्रॅक्टिकली विचार केला तर अमेझॉनचं जंगल हे जगातील सगळ्यात मोठ्ठं झालेलं कार्बन उत्सर्जन शोषून घेणारं ठिकाण आहे. परंतु 100000 हेक्टर म्हणजेच जवळपास 10000 स्क्वेअर किलोमीटर पेटलेल्या या वणव्याने अमेझॉन हा अंतरराष्ट्रीय प्रश्न बनला. हा वणवा इतका भयानक होता की नासाच्या सॅटेलाईट छायाचित्रांमधून अमेझॉनपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या ‘साओ पाऊलो’ शहरावर या वणव्याच्या धुराचे लोट दिसू लागले.

अमेझॉनियाचा (ब्राझीलीयन नाव) म्हणजेच अमेझॉनचा जवळपास 60 % भाग हा कायदेशीररित्या ब्राझीलच्या ताब्यात आहे. पेटलेल्या वणव्यामुळे गतवर्षी ५००००च्या वर आगीच्या दुर्घटनांच्या तक्रारी ब्राझीलमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. मुख्यत्वेकरून वणवा त्याच ठिकाणी व्यवस्थित भडकला होता ज्याठिकाची जमीन ही शेती करण्याकरिता वापरली जाते. ज्यामुळे झालं काय, की कर्बन- डायऑक्साईडचं उत्सर्जन प्रचंड प्रमाणात झालं असल्याचं नोंदवलं गेलं, फक्त कर्बन -डायऑक्साईडच नाही तर सोबतच कर्बन-मोनॉक्साईड सारख्या घातक आणि विषारी वायूंचेही प्रचंड प्रमाणात उत्सर्जन गेल्यावर्षी नोंदवण्यात आलेलं आहे. प्रदूषण वाढीबरोबरच या विध्वंसकारी वणव्यात अमेझॉनच्या जैवविविधतेचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं जे भरुन काढायला मनुष्य नावाच्या प्रजातीला बराच वेळ लागणार आहे, कितीतरी विविधप्रकारच्या वनस्पती, औषधी वनस्पती, झाडं झुडपं सोबतच सुखानं जगणाऱ्या प्राण्यांच्या जमाती या वणव्यात जळून खाक झाल्या. 1.7 बिलियन इतकं अमेझॉनचं क्षेत्रफळ आहे, ज्यात झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे किंवा मनुष्याने केलेल्या (स्वार्थासाठी बहुदा) डिफॉरेस्टेशनमुळे पडणारा अमेझॉनच्या फॉरेस्टचा हवामानावर पडणारा इम्पॅक्ट हा ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज रॅपिडली वाढण्याच्या रिझल्टमध्ये परिवर्तित झाला आहे. कॅलिफोर्निया आणि साऊथ अमेरिकन जंगलांच्या तुलनेत अमेझॉनच्या जंगलात नैसर्गिकरित्त्या वणवे पेटण्याचं प्रमाण फारच कमी आहे त्यामुळे गतवर्षी पेटलेला वणवा हा मानवनिर्मित असण्याचीच शक्यता अजिबात नाकारता येत नाही, उष्णतेच्या काळात ‘तोडा आणि पेटवा’ या मनुष्यनिर्मित नियमाची किंमत वणव्याच्या रुपात अमेझॉनमधील जैवविविधतेला चुकवावी लागलेली आहे. जगातल्या १००% कर्बन- डायॉक्साईड पैकी २५% कर्बन- डायॉक्साईड अमेझॉनची जैवविविधता शोषून घेते, यावरुन मानवाने आपल्या भविष्याशी किती मोठ्ठा जुगार खेळला आहे हे आपल्या लक्षात आलं असेल.

अमेझॉनचा वणव्याची किंमत ही ब्राझीलला जवळपास 20 ते 30 वर्षापर्यंत चुकती करावी लागणार आहे, जगातल्या पर्यावरण तज्ञांच्यामते ही किंमत जवळपास 1000 बिलियन युएस डॉलर्स ते 4 ट्रिलीयन युएस डॉलर्स इतकी आहे. ह्याचमुळे अमेझॉनचा वणवा हा एक सिरीयस इंटरनॅशनल कॉन्सर्न बनला. 45 व्या जी7 समीट मध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, सुरुवातीला ब्राझीलीयन पंतप्रधानांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यास नकार दिला, परंतु अंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाल्याने काही कालावधीनंतर ब्राझीलच्या पंतप्रधानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ४०००० च्या वर तुकड्या तैनात केल्या त्याचबरोबर पुनर्वसनासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी लागणारा निधी सुद्धा या तुकड्यांना पुरवण्यात आला. युद्धपातळीवर परिस्थिती आटोक्यात आणण्याचं काम सुरु झालं, काही कालावधीनंतर ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोलोसनोरो यांनी पुढील साठ दिवसांपर्यंत अमेझॉनच्या जंगलात कोणत्याही प्रकारची डिफॉरेस्टेशनसाठी आग लावण्यावर बंदी घालण्याचा हुकूम काढला. ज्या ज्या म्हणून देशांना लागून अमेझॉनचं जंगल आहे त्या सर्व देशांना ब्राझीलप्रमाणेच थोड्याफार फरकाने या वणव्याचा फटका बसला. २०१९ च्या जी ७ समिटमध्ये वणव्यामुळे नुकसान झालेल्या देशांना प्रथमोपचारासाठी आणि पुनर्वसनासाठी मदतीचा हात म्हणून निधी अमेरिकन यूएस डॉलर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आला.

ब्राझीलमध्ये अमेझॉनचं डिफॉरेस्टेशन हा पूर्वापार चालत आलेला महत्वाचा मुद्दा आहे, अमेझॉनच्या एकूण क्षेत्रफळापैकी ६०% भाग ब्राझिलकडे असल्याने शेती, खाणकाम यासाठी अमेझॉनचा भूभाग सर्रास वापरला जातो, एका सर्व्हेनुसार अमॅझॉनचा बराचसा भाग हा मुख्यत्वेकरुन पाळीवप्राणी आणि गुरेढोरे याच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २००४ साली ब्राझिलियन सरकारने अमेझॉनचं डिफॉरेस्टेशन रोखण्यासाठी आणि त्याला लगाम घालण्यासाठी एक डिफॉरेस्टेशन फेडरेशन ऍक्शन प्लॅन एस्टॅब्लिश केला. अमेझॉनच्या दुर्घटनेला ब्राझीलच्या पंतप्रधानांना सरळ सरळ जबाबदार धरण्यात आलं, ब्राझील सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि नाकर्तेपणामुळे २०१९च्या ऑगस्टमध्ये ब्राझिलियन जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला, ब्राझिलियन जनता रस्त्यावर उतरून निदर्शनं करु लागली फक्त ब्राझीलमध्येच नाही तर लंडन, पॅरिसमध्येसुद्धा सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली. अमेझॉनच्या जंगलात रहाणाऱ्या जवळपास अडीच लाख स्थानिक लोकांना या वणव्याची किंमत मोजावी लागली. अमेझॉनमधील स्थानिक रहिवाशी आणि ब्राझील सरकार यांच्यात चिखलफेक सुरु झाली. त्यात काही डिफॉरेस्टशनच्या कारणावरुन स्थानिक रहिवाश्यांवर ब्राझील सरकारने गुन्हेगारीचा ठपका ठेवत त्यांच्या राहत्या ठिकाणाहून हाकलवून देण्यात आले, त्यातील काही स्थानिक रहिवाश्यांनी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी ब्राझील सरकारविरोधात लढण्याचे ठरवले.

तातडीने उपाययोजना न केल्याने आणि तडकपणे परिस्थिती हाताळण्यास नकार दिल्याने ब्राझील सरकारवर स्थानिक जनतेकडूनच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ब्राझीलच्या पंतप्रधानांवर जबरी टीका करण्यात आली, फ्रेंच पंतप्रधान इम्यानुअल मॅक्रोन यांनी ब्राझीलच्या पंतप्रधानांवर टीका करताना म्हंटलं होतं कि ‘आमचं घर जळत आहे’. अमेझॉनच्या जंगलात काही स्थानिक रहिवाश्यांचा गट हा मुख्यत्वेकरून बीफ आणि सोया चं उत्पादन करतो त्यामुळे हा सुद्धा एक ब्राझीलच्या आणि स्थानिक रहिवाश्यांमधला चिखलफेकीचा मुद्दा बनला. त्यामुळे अमेझॉनचा हा वणवा ब्राझील सरकार, स्थानिक अमेझॉनमधील रहिवाशी आणि ब्राझिलियन जनतेसाठी डोकेदुखी ठरला.

इतर देशांवर झालेला परिणाम

बोलिव्हिया

ब्राझीलप्रमाणेच बोलिव्हिया या दक्षिण अमेरिकेत स्थित असलेल्या देशालाही अमेझॉनच्या वणव्याची किंमत चुकवावी लागली. अमेझॉनचा जवळपास ८% भाग हा बोलिव्हियामध्ये आहे, अमेझॉनच्या वणव्यात बोलिव्हियाच्या अमेझॉनचा ६ मिलियन एकर भाग जाळून खाक झाला. २०१९च्या ऑगस्टमध्ये ४०००च्या वर व्हॉलेंटीअर्सनी बोलिव्हियामधील आमेझॉनच्या वणव्याची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

पराग्वे

२०१९च्या ऑगस्ट महिन्यामध्ये पराग्वे देशाच्या फेडरल सरकारने फायर इमर्जन्सी जाहीर केली, युद्धपातळीवर काम करून पराग्वे सरकारने परिस्थिती आणली, इतर देशांप्रमाणे पराग्वे सरकारलाही बऱ्यापैकी या वणव्याचा फटका बसला, जवळपास १००००० हेक्टर्स अमेझॉनचा पराग्वेमध्ये स्थित असलेला भूभाग या बनवत जाळून खाक झाला.

पेरु

इतर देशांप्रमाणे पेरूमधील परिस्थिती काहीही वेगळी नव्हती, उलटपक्षी २०१९साली पेरूमध्ये ब्राझीलच्पेक्षा दुप्पट आगीच्या वणवे भडकण्याच्या तक्रारी होत्या. बेकायदेशीरपणे वणवे भडकावून डिफॉरेस्टेशन करण्यासाठी तेथील स्थानिक रहिवाश्यांना जबाबदार धरलं गेलं ज्यात मुखत्वेकरून खोदकाम करणारे, आणि अवैध कामं करणारे होते असं सांगितलं जातं. २०१९ मध्ये जवळपास १३० वणवा भडकल्याच्या तक्रारी पेरुमध्ये नोंदवण्यात आल्या होत्या.

अमेझॉनच्या जंगलाला जगाची फुफ्फुसं म्हणून संबोधलं गेलं आहे ज्यमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेला जास्त महत्व प्राप्त झालं, आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेचे पडसाद उमटले. फ्रान्सचे पंतप्रधान इम्यानुअल मॅक्रोन यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने जी ७ समिट घेण्यात आली ज्यात ब्राझीलच्या सरकारवर सडकून टीका करण्यात आली, अमेरिका या सगळ्या गोंधळात परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तयार होती परंतु परिस्थिती कोणत्या प्रकारे हाताळली जावी यासाठी अमेरिकेला ब्राझीलबरोबर चर्चा करण्यात काही स्वारस्य नव्हतं ज्यामुळे या जी ७ समिटला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनुपस्थित होते. यानंतर झालेल्या अमेझॉन समिट मध्ये ब्राझील, पेरु, बोलिव्हिया, कोलंबिया या देशांमध्ये अमेझॉन जंगल आणि आपत्ती व्यवस्थापन प्रतिसादाचे परीक्षण आणि संबंधित प्रतिसादातून व्यवस्थित समन्वय साधला जाण्यासाठी एक माहिती नेटवर्क उभारण्याबाबत एक करार करण्यात आला.

तशी जंगलात उन्हाळ्यात वणवे पेटणे हि काही नवीन गोष्ट नाही पण ३००० किलोमीटर पर्यंत जर वणव्याची धग आणि वनव्याचा धूर पोहोचत असेल तर वेगळी पाऊलं उचलायची वेळ आली आहे असं समजण्यास काहीही हरकत नाही. अमेझॉन हा जगाचा एक अतिमहत्त्वाचा भाग आहे ज्यात कोण जाणे मानवाला माहीतही नसतील अशा सजीव प्रजाती असतील अथवा एव्हाना त्या वणव्यात नष्टही झाल्या असतील, तर त्या जपणं अमेझॉनच जागतिक पातळीवरील महत्व मेंटेन्ड ठेवणं ह्याची जबाबदारी जशी अमेझॉनचा ६०% भाग व्यापणाऱ्या ब्राझीलचा आहे तसेच ती जबाबदारी अमेझॉनला जोडून असणाऱ्या इतरही ८ देशांची आहे, ज्यामध्ये अमेझॉनच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंधित देशांना निधी उपलब्ध करुन देण्यासारख्या उपाय योजनांचा सहभाग होतो. काहीही असो पण पेटलेल्या वणव्याने जैवविविधता तर जाळून खाक झालीच, त्याचबरोबर जैवविविधतेची जी वर्षानुवर्षांपासून वेल मेंटेन्ड फूडचेन होती ती सुद्धा नष्ट झाली.

माझ्यामते यात चूक कोणाचीही असली तरी अमेझॉन जंगलातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ज्या उपायोजना केल्या गेल्या अथवा करायला पाहिजे होत्या त्या तोटक्या होत्या, तसंच अमेझॉनसारख्या अतिमहत्वाच्या जंगलात (ज्याला जगाचं फुफ्फुस समजलं जातं) त्याठिकाणी इतकी बेपर्वाई आणि निष्काळजीपणा मनुष्य दाखवत राहिला तर होणारं कार्बन उत्सर्जन रोखणारं आणि सोबतच समस्त मनुष्य प्रजातीला दोन तृतीयांश शुद्ध हवा (ऑक्सिजन) पुरवणारं पृथ्वीवरचं एक अतिमहत्वाचं साधन आपण नामशेष करुन टाकू याची जाण जवळपास जगभरातील सर्वच देशांनी आणि संबंधित नेत्यांनी देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ठेवली पाहिजे नाहीतर उद्याच्या भविष्यात आपण पुढच्या पिढ्यांचे, सध्याच्या / भविष्यातल्या जंगली सजीव यांच्या नजरेत आपण नक्कीच गुन्हेगार ठरु असं माझं मत आहे.

आपल्याला ही पोस्ट आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा.

छायाचित्र स्रोत :- गुगल

  • ऋषिकेश पंचवाडकर.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s