द हिस्ट्री ऑफ नॉर्मंडी लँडिंग्स – डी डे

 जगाच्या इतिहासात अनेक चित्र विचित्र घटना घडून गेल्यात त्यातल्या बऱ्याचश्या घटना विस्मृतीत गेलेल्या आहेत, अशाच काही महत्वाच्या घटनांपैकी एक अतिशय महत्वाची घटना म्हणजे ‘

नॉर्मंडी लँडिंग्स’. दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रदेशात संयुक्त फौजांनी आक्रमण करून जर्मनांच्या नाझी सत्तेपासून नॉर्मंडी हा उत्तर फ्रान्समध्ये स्थित असलेला प्रदेश मुक्त केला,  या घटनेला दिलं गेलेलं दुसरं नांव म्हणजे ‘डी डे’. ६ जून १९४४ रोजी अमेरिकन, कॅनेडियन आणि ब्रिटिश फौजा फ्रान्सच्या नॉर्मंडी नामक तटबंदी असलेल्या किनाऱ्यावर उतरल्या. नॉर्मंडी लँडिंग्स हा इतिहासातील अनेक भयानक हल्ल्यांपैकी एक होता ज्यासाठी व्यापक प्रमाणावर नियोजन केलं गेलं. उत्तर फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रदेशात  स्थित असलेल्या जर्मन फौजांना बगल देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फसवणूक अभियान राबवण्यात आलं. 


१९४० च्या दरम्यान जर्मनीने उत्तर फ्रान्सच्या  नॉर्मंडी प्रांतावर आक्रमण करुन त्या प्रदेशावर कब्जा केला. 

फ्रान्सच्या डंकर्कच्या समुद्र किनाऱ्यावर स्थित असलेल्या ब्रिटिश फौजांना जर्मन फौजांकडून हाकलवून लावण्यात आले. त्यामुळे पुढे ब्रिटिश फौजांना संयुक्त पणे फ्रान्सवर असलेल्या जर्मन सत्तेला उखडून टाकण्यासाठीच्या संभाव्य मोहिमेत ब्रिटिश फौजांना संयुक्त पणे सामावून घेण्यासाठी स.न. १९४१ – ४२ च्या दरम्यान बराच अमेरिकेकडून विचारविनिमय करण्यात आला. परंतु नॉर्मंडी ह्या उत्तर फ्रान्समध्ये स्थित असलेल्या प्रदेशातील जर्मन फौजांवर आक्रमण करणं  म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती कारण अमेरिके समोर अडॉल्फ हिटलर नावाचा अत्यंत तिरसट, हेकट आणि क्रूर असा बलाढ्य प्रतिस्पर्धी होता ज्याला चकवा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्करी नियोजनाचा कस लागणार होता. परंतु हिटलर पण हिटलर होता, भविष्यात  फ्रान्सच्या उत्तरी सागर किनाऱ्यावर आक्रमण होऊ शकते शक्यतेपासून तो अजिबात अनभिज्ञ नव्हता, परंतु नक्की कोणत्या मोक्याच्या ठिकाणावर आक्रमण होईल याची नाझी फौजांना कल्पना नव्हती. हिटलरने फ्रान्सच्या उत्तर सागरी किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी ‘एर्विन रोमेल’ नामक जर्मन अधिकाऱ्यावर सोपवली, एर्विननेही आपली जबाबदारी काही काळ यथायोग्यपणे सांभाळली, फ्रान्सच्या उत्तर सागरी किनाऱ्यावर मजबूत तटबंदी होती परंतु काही काळाने या तटबंदीच्या सुरक्षे संदर्भात तक्रारी येऊ लागल्या ज्याची पूर्वकल्पना एर्विनने हिटलरला आधीच दिली होती. दुर्दैवाने मजबूत तटबंदी असलेल्या या उत्तर अटलांटिक किनाऱ्यावर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला ज्यासाठी हिटलरने एर्विनला जबाबदार ठरवले, कारण अटलांटिक वॉल ही सुरुंगांपासून, समुद्रतटापासून आणि पाण्यापासून जवळपास २५०० मैल लांब होती. 

उत्तर फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी लागणाऱ्या व्यापक नियोजनाने आता जोर धरला होता, हालचालींना बऱ्यापैकी वेग आला होता. अमेरिकेबरोबर असलेल्या सहयोगी राष्ट्रांनी फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी फ्रान्समधील ब्रिटनी, कॉंटेन्टीन पेनिन्सुला, नॉर्मंडी आणि पास-दि-कॅलॅसिस या भागांचा आक्रमण करण्यासाठी पर्याय म्हणून विचार करण्यास सुरुवात केली. त्यातील ब्रिटनी आणि कॉंटेन्टीन पेनिन्सुला हे दोन्ही प्रदेश प्रदेश द्विकल्प आणि अत्यंत अरुंद असल्याने नाझी फौजांना होणाऱ्या संभाव्य हल्ल्यात सहज रक्तपात घडवता आला असता, त्यामुळे ह्या दोन्ही पर्यायांना बगल देण्यात आली. पास – दि – कॅलॅसिस हे ठिकाण ब्रिटनच्या जवळपास असल्याने नाझी फौजांनी या ठिकाणाला प्रमुख लँडिंग झोन म्हणून निश्चित केले होते. ज्या कारणास्तव नॉर्मंडी हेच हल्ल्याचे प्रमुख ठिकाण म्हणून निवडण्यात आले. ड्वाईट हाइजनअवर हा ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’चा प्रमुख होता, नाझी फौजांना येड्यात काढण्यासाठी ‘डी  डे’ च्या आधी जवळपास ६ महिने तयारी सुरु केली होती, ज्यात पास – दि – कॅलॅसिस हेच हल्ल्याचे प्रमुख ठिकाण आहे असं नाझी फौजांना भासवण्यात हाईझनअवर हा यशस्वी झाला ज्यामुळे नाझी फौजा निश्चिन्त राहिल्या कारण नॉर्मंडी वरुन हल्ला करणं तसं संयुक्त फौजांना अशक्यप्राय आहे या भरवश्यावर नाझी फौजा निश्चिन्त राहिल्या होत्या. या नाटकात पार खोटा शस्त्रसाठा, खोटे रेडिओ ट्रान्समिशन्स, खोट्या खोट्या सैन्यांची फौजही पास- दि – कॅलॅसिस याठिकाणी तैनात करण्यात आली. ज्यामुळे नाझी फौजांनीही आपली फौज तैनात करण्यासाठीचे आदेश दिले. झालं काय अनेक क्लुप्त्या वापरुन हाइझनअवर ने जर्मनांच्या बऱ्यापैकी  सैन्याला पास – दि – कॅलॅसिस या ठिकाणी एकत्र येण्यास भाग पडलं ज्यामुळे नॉर्मंडीचा प्रदेश संयुक्त फौजांच्या लँडिंगसाठी मोकळा झाला. हाइझनअवर ने ऑपरेशन ओव्हरलॉर्ड च्या लँडिंगची तारीख ५ जून ठरवली होती परंतु समुद्राच्या लहरी हवामानामुळे  ५ जूनचा हल्ला २४ तास लांबणीवर पडला, हवामानशास्त्रज्ञांकडून  पुढील दिवस हा लँडिंगसाठी उपयुक्त आहे असे सांगण्यात आले. त्यादिवशी ५००० पेक्षा जास्त बोटी आणि सैनिकी तुकड्या, आणि जवळपास १०००० च्या लढाऊ विमाने हवाई हल्ल्याला आधार म्हणून ब्रिटनच्या इंग्लिश चॅनेलमधून सोडण्यात आली. डी डे लँडिंग्स / नॉर्मंडी लँडिंग्स : ६ जून १९४४ 

पहाटे ६ च्या सुमारास उभयचर आक्रमणास सुरुवात झाली, हजारोंच्या संख्येने पॅराट्रूपर्स आणि ग्लायडर्स सैन्याच्या तुकड्या नॉर्मंडीच्या समुद्री तटावर उतरल्या. ६ जूनच्या  संध्याकाळपर्यंत नॉर्मंडीच्या सागरी तटावर जमा झालेल्या संयुक्त फौजांची संख्या जवळपास १५६००० इतकी होती. व्यतिरिक्त युटा आणि ओमाहा बीचवर अगोदरच आक्रमण करण्यात आले होते, ज्याठिकाणी जवळपास २००० हुन जास्त अमेरिकन सैन्य जखमी झालं. १५६००० च्या सैन्याच्या तुकडीने यशस्वीरित्या नॉर्मंडीच्या सागरी तटावर आक्रमण केले होते. ज्यात जवळपास ५०००च्या वर संयुक्त सैन्याने आपला जीव गमावला, फसवं अभियान राबवून जर जर्मन फौजा विचलित झाल्या नसत्या तर या युद्धात आणखी जीवितहानी झाली असती. नंतर जवळपास तीन लाख सैनिकी तुकड्या फ्रान्सच्या नॉर्मंडी याठिकाणी जमल्या, नॉर्मंडीचा समुद्रकिनारा पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला. हजारोंच्या संख्येने लढाऊ वाहनं आणि लाखांच्या संख्येने लढाऊ उपकरणं सामील झाली.

 नॉर्मंडीवर आक्रमण झाले तेव्हा नाझी कमांडर एर्विन रोमेल हा अनुपस्थित होता ज्यामुळे जर्मन सैन्य गोंधळात पडलं. नाझी फौजांना विचलित करण्यासाठीच हा हल्ला केलेला असावा असं हिटलरला वाटलं, ज्यामुळे हिटलरने इतरत्र लढणाऱ्या जर्मन फौजांना नॉर्मंडीत स्थित असलेल्या आणि बचावात्मक हल्ला करत असलेल्या फौजांच्या मदतीसाठी पाठवण्यास नकार दिला, इतकंच काय त्याने आजूबाजूचे प्रदेशही संयुक्त फौजांच्या हवाली करण्यास नकार दिला. संयुक्त फौजांच्या तगड्या हवाईदलाच्या मजबूत हल्ल्यामुळे नाझी सैन्य जखडून पडलं, ज्यामुळे घुसलेल्या संयुक्त फौजांचा पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार करण्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ होतं ते मदतीसाठी उपलब्ध होण्यास बराच विलंब लागला. आपल्या सैनिकी तुकड्यांपर्यंत नाझी फौजांना पोहोचू न देण्यासाठी, अधले मधले नॉर्मंडीला जोडणारे सगळे पूल संयुक्त फौजांनी आपल्या प्रभावी हवाई हल्ल्यांच्या सहाय्याने उध्वस्त करून टाकले, ज्यामुळे सहयोगी राष्ट्रांना हल्ल्यासाठी आगेकूच करण्यास सोपं गेलं. 


नॉर्मंडीवर हल्ला झाल्यापासून दुसऱ्या आठवड्यातच नाझी सैन्याचा धुव्वा उडवत संयुक्त फौजांनी फ्रान्समधील महत्वपूर्ण अनेक बंदरांवर ताबा मिळवला. दुसऱ्या आठवड्यात नॉर्मंडीच्या सागरी तटावर जवळपास दहा लाख सैनिकी तुकड्या आणि तीन लाख लढाऊ वाहनं फ्रान्सवर पुढील आक्रमण करण्यासाठी सज्ज करण्यात आली.

१९४४ चा ऑगस्ट महिना नाझी (जर्मन) फौजांसाठी आणि पर्यायाने हिटलरसाठी कर्दनकाळ ठरला, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात संयुंक्त फौजा सीन नदीपर्यंत पोहोचल्या, या टप्प्यात नाझी फौजांना पॅरिसमधून आणि फ्रान्सच्या नॉर्थ- वेस्टर्न भागातून हुसकावून लावण्यात आले. जुलमी नाझी फौजांच्या कचाट्यातून नॉर्थ फ्रेंच प्रदेश मुक्त झाला. पुढील टप्प्यात जर्मनीवर आक्रमण करण्यासाठी संयुक्त फौजांना तयार करण्यात आलं, आधीच दहा लाख सैन्य असलेल्या फौजेला पूर्वेकडून आक्रमण करणाऱ्या सोव्हियत सैन्य येऊन मिळणार होतं ज्यामुळे संयुक्त फौजांची ताकद आणखी वाढणार होती.

नॉर्मंडीवर झालेल्या आक्रमणाने नाझिंच्याविरोधात मोठ्याप्रमाणावर जनक्षोभ उसळला आणि तो युद्धांच्या माध्यमातून बाहेर पडू लागला. नॉर्मंडीवर झालेला संयुक्त हल्ला हा हिटलरसाठी एक प्रचंड मानसिक धक्का होता, हिटलर पुरता डिवचला गेला होता त्यामुळे तो अधिकच चवताळला. परिणामस्वरुप सोव्हिएत फौजांविरोधात आक्रमण करण्यासाठी सैन्यांची जमवा जमव करण्यासाठी  म्हणून हिटलरने नाझी सैन्याला फ्रान्समध्ये पाठवण्यासाठी बंदी घातली.  १९४५ सालच्या मे महिन्यापर्यंत नाझी जर्मनीच्या आत्मसमर्पणाला अनौपचारिकरीत्या मान्यता दिली, या घटनेच्या जवळपास एक आठवडाभर आधी हिटलरने आत्महत्या केली होती. 

हिटलरच्या जुलमी सत्तेतून जर्मनी मुक्त झाल्याने, नॉर्मंडी लॅंडींग्सच्या लढाईला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले नॉर्मंडी लँडिंग्स / डी डे / ऑपरेशन ओव्हरलॉर्ड म्हणून संबोधली जाणारी ही लढाई जगाच्या इतिहासात  दुसऱ्या महायुद्धाच्या अंताची सुरुवात म्हणून ओळखली जाऊ लागली. नॉर्मंडीच्या युद्धावर आधारित ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ सारखा अतिशय उत्कृष्ठ …. असा चित्रपट तयार करण्यात आला, नॉर्मंडीच्याच लढाईवर आधारित ‘कॉल ऑफ ड्युटी’, ‘कॉल ऑफ ड्युटी – मॉडर्न वॉरफेअर’ सारख्या स्टोरी बेस्ड गेम तयार करण्यात आल्या आहेत. 
Image Source : Google


-ऋषिकेश पंचवाडकर


var aax_size=\’300×250\’; var aax_pubname = \’rushessensedu-21\’; var aax_src=\’302\’;

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s