Gig economy | गिग इकॉनॉमी

 भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती, इंडस्ट्रीज आणि सर्व्हिस या  3 सेक्टर्सवर आधारलेली आहे. ज्यातील पाहिलं आणि महत्वाचं सेक्टर म्हणजे अग्रीकल्चर (शेती). भारतात स्वातंत्रपूर्व काळापासून शेती आणि शेती संबंधित असलेल्या जवळपास सर्वच व्यवसायांनी (उदा. मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, पोल्ट्री फार्मिंग, डेअरी प्रोडक्शन / दुग्ध व्यवसाय इत्यादी ) . अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत या सेक्टरचं बऱ्यापैकी कॉन्ट्रिब्युशन असल्यानं या क्षेत्राला अर्थशास्त्रात महत्व दिलं गेलंय. भारतात शेती व्यवसायाची जशी भरभराट होत गेली त्याच बरोबरीने भारतात इंडस्ट्रीलायझेशन म्हणजेच औद्योगिकीकरण क्षेत्रातही भारताने बरीच प्रगती करून ठेवलेली आहे, इंडस्ट्री हे जवळपास 27% जीडीपी कॉन्ट्रिब्युशन देणारं सेक्टर आहे . या व्यतिरिक्त टॉप जीडीपी काँट्रीब्युटर म्हणून नंबर लागतो तो सर्व्हिस सेक्टरचा, 50 %  जीडीपी काँट्रीब्युशन देणारं सेक्टर म्हणून ओळख असलेल्या सर्व्हिस सेक्टरला वाढत्या ‘डिमांड’ मुळे आणि फायनल कान्स्युमर सर्व्हिसेसमुळे बरंच महत्व प्राप्त झालेलं आहे. इन्कम जनरेशनसाठी या क्षेत्रांचा वापर होत असला तरी भारतात जो बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे त्यावर सद्य परिस्थितीत बोलणं जास्त महत्वाचं ठरेल, आता बेरोजगारी म्हणजे काय? त्याचे प्रकार किती व कोणते? त्यासाठी भारत सरकार करत असलेल्या उपाययोजना कोणत्या? हे सगळं मी ‘अन-एम्प्लॉयमेंट’ नावाच्या माझ्या मागील पोस्टमध्ये लिहिलेलंच  आहे. 

२०२० उजाडलं ते कोरोना नावाचं विचित्र संकट घेऊनच. लॉकडाऊन जाहीर झाला आणि कार्पोरेट क्षेत्रातल्या कंपन्या ओस पडल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम चा ऑप्शन ऍव्हेलेबल झाला, कामाच्या पद्धतींमध्ये थोडी शिथिलता आली. इथून तिथून सर्वच प्राथमिक, माध्यमिक शाळा कॉलेजेसना सुट्ट्या जाहीर झाल्या, आज जवळपास आठ महिन्यांनंतर लोकांना लॉकडाऊनची सवय झाली, याकाळात बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपले असलेले जॉबही गमावले. काही कर्मचारी जे पर्मनंट होते ते सुद्धा जॉबलेस झाले असतील. परंतु बेरोजगारीच्या समस्येला एक पर्याय म्हणून सध्या ‘गिग इकॉनॉमिकडे’ बघितलं जातंय. 

गिग इकॉनॉमी हा भारतातल्या ऍक्टिव्हली वर्किंग फोर्सच्या पसंतीस उतरलेला एक अल्टरनेटिव्ह आहे, मग ते कार्पोरेट सेक्टर असो वा इतर कोणतंही सेक्टर असो, जवळपास सर्वच क्षेत्रांवर गिग इकॉनॉमिचा प्रभाव दिसून येतो.  काम करण्यासाठी लागणारी स्वायत्तता, नवनवीन स्किल डेव्हलपमेंटसाठी मिळालेली चालना, एक अतिरिक्त इन्कम जनरेशनचा सोर्स या कारणांमुळे ‘गिग इकॉनॉमी’ मधील या लवचिक कार्यपध्दतीकडे भारतातल्या वर्कफोर्सचा कल गेल्या काही महिन्यात वाढलेला दिसून येतो. गिग इकॉनॉमीत मुख्यत्वेकरून फ्रीलान्सर्सचा समावेश होतो, एवढंच काय गिग इकॉनॉमिमधून जास्तीत जास्त इन्कम जनरेशन करणारी कॅटेगरी म्हणून आपण फ्रिलान्सर्सकडे पाहू शकतो.

उदा. २७ वर्षाची ज्युलिया एक फॅशन डिझायनर आहे, वर्षभर एका नामवंत कंपनीत काम करून वैयक्तिक कारणास्तव तिने या वर्षी जॉब सोडला. हेक्टिक वर्कशेड्युल नको असल्या कारणाने वर्क – लाईफ बॅलन्स सांभाळण्यासाठी ज्युलियाने उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून फ्रिलान्स वर्क करण्यास सुरुवात केली, ३ – ३ महिन्यांच्या दोन प्रोजेक्ट्सवर काम करून म्हणजे थोडक्यात ६ महिने काम करून पुढचे ६ महिने ज्युलियाने इतर गोष्टींना प्राधान्य देण्याचे ठरवले, एवढंच नाही तर या प्रोजेक्ट्समधून ती तिला एक्स कंपनीत  मिळत असलेल्या सॅलरीपेक्षा अधिक इन्कम जनरेशन करण्यात यशस्वी झाली.


ज्युलियाचं उदाहरण हे एक प्रॉपर गिग वर्करचं उदाहरण आहे, ट्रेडिशनल जॉब आणि ट्रेडिशनल जॉब स्टाईलला फाटा मारत ज्युलियाने गिग वर्किंगचा मार्ग निवडला. ज्यामुळे तिला वर्क सिलेक्शनचं स्वातंत्र्य तर मिळालंच याशिवाय गिग वर्किंग तिच्यासाठी प्रोफीटेबलसुद्धा ठरलं. कोणत्या लिमिटपर्यंत जाऊन काम करायचं आणि कुठं थांबलं पाहिजे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला गिग इकॉनॉमी देते. टेक्नोलॉजीचा ट्रेंड भारतात दरवर्षी बदलतोय, ज्यामुळे वर्किंग फोर्सला (मग ती एम्पलॉयड असो वा अन एम्पलॉयड) आपल्या सोयीच्या नवनव्या शक्यता नवनवे बदल खुणावत आहेत. भारतात कीपॅडचे अथवा बटणांच्या मोबाईलच्या जागी टचस्क्रीनवाले फोन आले, सोबतीला इंटरनेट आलं जीपीआरएस पासून आता 5जी पर्यंत बरेच बदल झाले. याचा फायदा असा झाला की, अनेक टेक्निकल प्लॅटफॉर्म निर्माण झाले ज्यांच्या माध्यमातून फ्रिलान्सर्सनी आपल्या प्रोफेशनल सर्व्हिसेस या प्लँटफॉर्म्सच्या माध्यमातून पुरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे टेक्निकल प्लॅटफॉर्म्स फ्रिलान्सर्सना इन्कम जनरेशन करण्यासाठी एक वरदानच ठरले, याच कारणास्तव भारतात डिजिटलायझेशन मध्येही वाढ झाली. गिग इकॉनॉमिचा एक साधा नियम आहे,  आपण जर एखाद्या स्किलमध्ये पारंगत असाल तर संबंधित प्लॅटफॉर्मवर साइनअप करा, आपल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार काम निवडा, आणि पैसे कमवा. एक अतिरिक्त इन्कम जनरेशनचा ऑप्शन आणि भारतातल्या लोकांमध्ये वाढीस लागलेल्या तंत्र साक्षरतेमुळे गिग इकॉनॉमीला बरेच महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या स्वप्नांच्या, आणि आकांक्षांच्या मागे धावत सुटलेला आजचा वर्किंग लेबर हा पारंपरिक ऑफिसच्या कार्यपद्धतीला छेद देत आज मोठ्या प्रमाणावर गिग सेक्टरकडे वळलेला आपल्याला दिसून येतो. याचाच परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेचा कलही पारंपरिक कार्यपध्दतीकडून,  पार्ट टाईम वर्किंगला सपोर्ट करणाऱ्या गिग इकॉनॉमिकडे वळला आहे.

काही कंपन्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन लेबर मार्केटम ध्ये भारत हा २४% नी  आघाडीवर आहे. एव्हढंच नाही तर भारतातल्या  जवळपास ६०% कंपन्यांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी २०% हे फ्रिलान्सर्स आहेत, आणि एका सर्व्हेनुसार ही  संख्या येत्या दोन वर्षात आणखी वाढेल. 

कार्पोरेट अथवा इतर कोणत्याही कंपन्या स्वतःला गिग इकॉनॉमिचा भाग बनण्यासाठी आणि स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला कशाप्रकारे तयार करतात यावर गिग इकॉनॉमिचे यश अवलंबून आहे. आपण (वर पाहिलेल्या ज्युलियाच्या उदाहरणाप्रमाणे) कोणत्या पद्धतीत आणि किती वेळ काम केलं पाहिजे ह्याची स्वायत्तता असल्यामुळं काम करणाऱ्या व्यक्तींची वर्क व्हॅल्यूज जपल्या जातील, त्याच प्रमाणे पॉलिसी मेकर्स, बिझनेसमन्स, आणि सरकार यांनी एकत्रितपणे मिळून तयार केलेल्या फ्रेमवर्कला सद्य आणि भविष्यकालीन एम्प्लॉयड  अथवा अन- एम्प्लॉईड वर्कफोर्सकडून मिळालेली मान्यता हा ही  गिग इकॉनॉमीच्या यशामागील एक महत्वाचा फॅक्टर म्हणून लक्षात घ्यायला हवा आहे. २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्यात गिग इकॉनॉमिचा मोठयाप्रमावर वाट असेल एवढं नक्की. गिग इकॉनॉमीत वर्किंग लेबर फोर्सचा सक्रिय सहभाग वाढवून, गिग इकॉनॉमी मधून अधिकतम उत्पन्न मिळवण्यासाठी ज्या उपाय योजना कराव्या लागणार आहेत त्यात बिझनेस प्रोसिजर मध्ये मॉडिफिकेशन करून ती जास्तीत जास्त एम्प्लॉयी ओरिएंटेड बनवणे, क्वॉलिटी वर्कला प्राधान्य देणे, वेळोवेळी  टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन करणे, डेटा प्रायव्हसीवर भर देणे या गोष्टींचा समावेश होतो, आणि वित्तीय अधिकाऱ्यांसोबत या जबाबदाऱ्या पर्यायाने बिझनेस मॅनॅजमेंट करणाऱ्यांवर पडतात. ह्याचप्रमाणे वर्किंग स्किल्स, कामातील कन्सिस्टंसी, कामातील लवचिकता, अनुकूलता आणि हार न मानण्याची क्षमता ह्या गोष्टी आत्मसात करुनच एक पर्फेक्ट गिग वर्कर घडवला जाऊ शकतो, जेणेकरून तो भारतीय गिग इकॉनॉमिला एका नव्या उंचीवर नेण्यात हातभार लावू शकेल यात नाही. आजमितीला जगाच्या एकूण फ्रिलान्स वर्क प्रोव्हायडेशन करण्याच्या क्षमतेत एकट्या भारतातून एकूण 40%  फ्रिलान्स वर्किंग उपलब्ध करुन दिले जाते. त्यामुळे भारतात उपलब्ध असलेलं लार्ज लेबर मार्केट जर गिग सेक्टरकडे वळलं तर भारतीय अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नक्कीच जाऊ शकेल. 

  • ऋषिकेश पंचवाडकर

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s