How to Win Friends & Influence People | हाऊ टु विन फ्रेंडस अँड इंफ्लुएंस पीपल | बूक रिव्ह्यू | Book Review

 

आजकाल बेस्ट सेलर मार्केटमध्ये निरनिराळ्या प्रकारची \’सेल्फ हेल्प\’ टाइप पुस्तके विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत त्यापैकीच एक छान पुस्तक म्हणजे डेल कार्नेगी या लेखकाने लिहिलेलं \’हाऊ टु विन फ्रेंडस अँड इंफ्लुएंस पीपल\’. डेल कार्नेगी हे 19 व्या शतकातील एक अमेरिकन लेखक आणि प्राध्यापक होते.  या पुस्तकाची पहिली प्रत 1937 साली प्रकाशित झाली तेव्हापासूनच ह पुस्तक इंटरनॅशनल बेस्टसेलर म्हणून गणले जाऊ लागले. टायटल प्रमाणेच ह्या पुस्तकात मित्र कसे बनवावेत, माणसं कशी जोडावीत या थीमवर साधारण हे पुस्तक आधारित आहे. विविध लोकांबरोबर असताना आलेले अनुभव, नवीन लोकांना / व्यक्तींना भेटून त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेताना लेखकाला आलेले काही वैयक्तिक तर काही इतर व्यक्तींच्या दृष्टिकोनातले अनुभव यांचं या पुस्तकात विश्लेषण केलं आहे, त्यामुळे नवीन वाचकाला तसं सुरवातीला ही पुस्तक बोअर करु शकतं. पण ह्या पुस्तकांतल्या गोष्टी सुरुवातीला थोड्या बोअर वाटल्या तरी प्रत्येक गोष्ट ही एका निष्कर्षावर आधारलेली आहे त्यामुळे मलातरी पहिल्या अथवा दुसऱ्या चॅप्टर नंतर ही पुस्तक वाचण्यात थोडा इंट्रेस्ट निर्माण झाला. लोकांची निंदा करण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न का केला पाहिजे, क्रिटीसीझम ऐवजी लोकांना सहानुभूति, सहिष्णुता देणं कसं फायद्याचं आहे हा पहिल्या चॅप्टरचा निष्कर्ष आहे जो लेखकाने अनुभव कथनाच्या माध्यमातून उलगडला आहे. कोणताही हातचा न राखता लोकांच्या चांगल्या गुणांची मुक्त कंठाने स्तुति करत रहाणे जेणेकरून लोक तुमच्या मतांचा आदर करत राहतील या निष्कर्षावर येऊन दूसरा चॅप्टर संपतो. आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तिमध्ये गरज आणि उत्सुकता निर्माण व्हायला हवी असे पुढच्या चॅप्टरमधून मिस्टर कार्नेगी वाचकांना सुचवतात. खरं सांगायचं तर मी इथे थोडा कंटाळलेलो कारण पुस्तकात दिलेले जे प्रिन्सिपल्स अथवा निष्कर्ष आहेत ते बऱ्यापैकी प्रायमरी अवस्थेतले आहेत असं माझं मत आहे (टु बी फ्रँक), पण उगीच का अर्धवट वाचून सोडायचं म्हणून मी पुस्तक पूर्ण वाचायचं ठरवलं होतं. तर, पुस्तक चार पार्ट मध्ये विभागून लिहिलं गेलं आहे, तिसऱ्या चॅप्टर नंतर पहिला पार्ट संपतो.

 दुसऱ्या पार्टमध्ये सहा चॅप्टर आहेत, जे लोकांच्या इतर गोष्टींमध्ये जेन्यूइनली इंट्रेस्ट घेणे ( हा खरं तर बऱ्यापैकी महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे या चॅप्टरपासून मी पुस्तक जरा इंटेन्सली वाचायला लागलो), त्याचप्रमाणे \’व्हाय बीइंग अ गुड लिसनर इज इम्पॉर्टंट\’, हाऊ टु एनकरेज अदर पीपल टु टॉक अबाऊट देमसेल्व्स\’, हाऊ टु टॉक ईन टर्म्स ऑफ अदर पीपल्स इंट्रेस्ट\’ आणि तत्सम काही प्रिन्सिपल्स संबंधित लिहिला आहे, त्यामुळे आपण जर एक पॅशनेट रीडर असाल तर माझ्याप्रमाणे आपल्यालाही दुसऱ्या पार्टपासून ही पुस्तक वाचण्यात थोडा इंट्रेस्ट निर्माण झाल्यावाचून रहाणार नाही. 

 

त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीबरोबर होणारी अर्ग्यूमेंट का टाळली पाहिजे अथवा भूतकाळात एखाद्या व्यक्तीसोबत अर्ग्यूमेंट झाली असल्यास ती का टाळायला हवी होती, तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या मतांचा आदर राखणे (आपण चुकीचे आहात असं नं सांगता), जर आपण चुकीचे असू तर ती चूक का कबूल केली पाहिजे या प्रकारच्या 12 प्रिन्सिपल्सवर हा तिसरा पार्ट आधारित असून माझ्या मते ह्या पुस्तकातला हा पार्ट वाचकांना थोडं फार पीपल नेटवर्किंगबद्दल शिकवून जातो. पुस्तकाचा चवथा आणि शेवटच्या पार्टमध्ये मिस्टर कार्नेगी ही वाचकांना लीडर होण्याचे आवाहन करतात, हा पार्ट लोकांना अप्रीशीएट करणे, क्रिटीसाइज न करता लोकसंग्रह जपणे, एखाद्या चांगल्या आयडिया साठी लोकांना मोटीव्हेट करणे, आपल्या सर्कलमधील लोकांना आनंदात ठेवणे आणि इतर अशा 9 प्रिन्सिपल्सवर आधारलेला आहे. माझ्यामते हे पुस्तक पर्सनल आयुष्यात जेवढे उपयोगाचे आहे त्याचप्रमाणे ते प्रोफेशनल आयुष्यातही बरेच उपयोगाचे आहे. 

 

लेखकाच्या म्हणण्यानुसार ही पुस्तक आपल्याला नवीन मित्र, नवीन व्यक्तीशी परिचय करण्यास शिकावते, ईतर व्यक्तींना आपल्या विचारसरणीचा आदर करण्यास शिकवते, वाचकांचे कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव करण्यास मदत करते, तसेच नवीन क्लाईंट्स आणि कस्टमर्सना नव्याने एप्रोच होण्यास मदत करते, परंतु यातील लेखकाच्या काही प्रिन्सिपल्सशी मी पूर्णपणे सहमत नसलो तरी काही प्रिन्सिपल्स आणि चॅप्टर्स हे अनुकरण करण्याजोगे आहेत. त्यामुळे नव्याने ही पुस्तक वाचणाऱ्या वाचकांना मी सजेस्ट करेन की ह्या पुस्तकातून काही शिकायचं असल्यास हे पुस्तक आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच ह्या पुस्तकातल्या चॅप्टर्सची वाचकाने उजळणी केली पाहिजे, या पुस्तकात जे प्रिन्सिपल्स लेखकाने दिलेले आहेत ते आपल्या आयुष्यात नव्या वाचकाने अप्लाय केले पाहिजेत (हे माझं वैयक्तिक मत आहे), स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगले बदल घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने निदान दोन वेळा तरी हे पुस्तक वाचलं पाहिजे असं मला वाटतं.  माझ्याबद्दल सांगायचं झाल्यास हे पुस्तक आता जवळपास 2 वर्षांपासून माझ्या पर्सनल लायब्ररीत आहे. आयुष्यात प्रगती करु इच्छिणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असे प्रिन्सिपल्स आणि अतिशय सोप्या भाषेत करण्यात आलेली त्या प्रिन्सिपल्सची मांडणी हे ह्या पुस्तकाचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करता करता इतर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणणे ही या पुस्तकाची कोअर आयडिया आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला मिस्टर कार्नेगी यांनी या पुस्तकातून जास्तीतजास्त प्रॉडक्टीव कसं व्हावं या संबंधी 9 महत्वाच्या सूचना दिल्या आहेत, नवीन वाचकाने त्या सूचना पाळून ही पुस्तक वाचल्यास ही पुस्तक नवीन वाचकाला नक्कीच काही बाबतीत फायदेशीर ठरू शकतं असं माझं मत आहे. साधारण 100 – 200 या रेंजमध्ये या पुस्तकाची किंमत असून हे पुस्तक ऑनलाइन अॅमेझोन, फ्लिपकार्टसारख्या साइट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे आपणांस \’सेल्फ हेल्प\’ बुक्स वाचण्यात आणि मुख्यत्वेकरून वाचन करण्यात इंट्रेस्ट असेल तर आपण हे पुस्तक एकदा वाचण्यास काहीच हरकत नाही.  

 

आपल्याला हा लेख आवडला असल्यास कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, लेख नावासकट शेयर करण्यास हरकत नाही. 

– ©ऋषिकेश पंचवाडकर      

 
POST TRANSLATION ~ ENGLISH 
 
 
 

There are a variety of self-help type books available in the best seller market these days, one of which is Dale Carnegie\’s How to Win Friends and Influence People. Dale Carnegie was an American writer and professor in the 19th century. Ever since the first copy of this book was published in 1937, the book has been considered an international bestseller. Like the title, this book is based on the theme of how to make friends, how to connect people. The book analyzes the experiences of being with different people, some personal experiences of the author while meeting new people / individuals and getting to know their personalities, so the new reader may found this book bit boring at the beginning. Although the stories in this book seemed a bit boring at first, but everything is based on one specific conclusion, so i got myself little involved in this book after reading first or second chapter of the book. The conclusion of the first chapter is that it is better to try to understand people than to condemn them, how it is beneficial to give empathy and tolerance to people instead of criticism, which is revealed by the author through experience narration. The second chapter concludes with the conclusion that praising the good qualities of the people with open arms without holding any hand so that people will continue to respect your opinions. From the next chapter, Mr. Carnegie suggests to readers that there should be a need and curiosity in the person in front of you. In fact, I was little bored here because I thought the principles or conclusions in the book are pretty much primary (to be frank), but I decided to read the whole book because I didn\’t wanted to leave it halfway through. So, the book is divided into four parts, the first part ends after the third chapter.
 The second part has six chapters, which teaches how to get genuinely interested in other things of people (which is actually a very important part, which made me read the book a little more intensely from this chapter), as well as \’Why Being a Good Listener is Important\’, How to Encourage Other People to Talk about them themselves, How to talk in terms of other people\’s interests, and some similar principles, so if you are a passionate reader, like me, you will not be left without a little interest in reading this book from the second part.
 
Similarly, why avoid an argument with a person or if you have had an argument with someone in the past, as well as respecting the other person\’s opinion (Without saying that you\’re / were wrong), if you are wrong, why you need to admit it? This third part is based on the principles and I think this part of the book teaches the readers a little bit about Networking of people. In the fourth and final part of the book, Mr. Carnegie appeals to readers to be leaders. I think this book is as useful in personal life as it is in professional life.
 
According to the author, the book teaches you to make new friends, to introduce new people, to teach others to respect your thinking, to help improve readers\’ communication skills, and to help new clients and customers to reach new ones, Although I do not agree with some of the author\’s principles. However, some principles and chapters are worth emulating. Therefore, I would suggest to the new readers that if you want to learn something from this book, this book is very useful for you and the reader should review the chapters in this book, the principles given by the author in this book should be applied in your life by the new reader (this is my personal opinion). I think a person who wants to make a good change in his personality should read this book at least twice. As for me, this book has been in my personal library for almost 2 year now. The strong points of this book are the principles that are useful for the person who wants to make progress in life and the layout of those principles done in very simple language. The core idea of ​​this book is to change the personality of other people while improving your own. At the beginning of the book, Mr. Carnegie gives 9 important tips on how to be as productive as possible from this book, I think this book can definitely be beneficial to the new reader in some respects, if the new reader follows this advice. The book is priced between Rs 100 to Rs 200 and is available for sale online on sites like Amazon and Flipkart, so if you are interested in reading self-help books and reading mainly, you should read this book once.
 
If You Liked this article, post your opinions through comments. you can share the article with name. 
 
 
-© Rushikesh Panchwadkar
 
 Image Source: People Networking 
 
 
 

                                                        

https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

4 thoughts on “How to Win Friends & Influence People | हाऊ टु विन फ्रेंडस अँड इंफ्लुएंस पीपल | बूक रिव्ह्यू | Book Review

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s