हॅप्पी बर्थडे ‘धर्मा’

6 जुलै 1985 साली सिंधी कुटुंबात त्याचा जन्म झाला, ‘ सिंह’ हे अडनांव शीख असलेल्या त्याच्या आजोबांकडून मिळालं. 2014 साली आलेल्या ‘बॅंड बाजा बारात’ पासून करियरची सुरवात करुन त्याने इंडस्ट्रीत आपलं पाऊल घट्ट रोवलं, त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या भूमिकेपासून पुढे मिळालेल्या प्रत्येक भूमिकेत प्राण फुंकून त्याने त्याच्या भूमिकांना योग्य न्याय दिला. अभिनयाच्या लाभलेल्या नैसर्गिक देणगीमुळे थोड्याच कालावधीत तो प्रेक्षकांच्या आणि पर्यायाने फॅन्सच्या गळ्यातला ताईत बनला. स्वतच्या कामाबद्दल असलेली प्रचंड एनर्जी आणि उत्सुकता यामुळे इंडस्ट्रीत ‘एनर्जी हाऊस’ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. विचित्र फॅशन ट्राय करण्याच्या त्याच्या सवयीने तर तो अधिकच पॉप्युलर झाला. कोणालाही असं फारसं वाटत नव्हतं की हा मुलगा एक दिवस बॉक्स ऑफिस गाजवेल, २०१२ पासून फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटीच्या शंभर यादीमध्ये नामांकित झालेल्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी तो एक ठरला. “बॅंड बाजा” पासून ते “गली बॉय” पर्यंत त्याने अनेक सुपरहिट्स दिलेल्या बॉलीवूडच्या पॉवरपॅक्ड एनर्जीहाऊस अॅक्टरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

– ऋषिकेश पंचवाडकर

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s