मॅगी आणि गैरसमज 🍝
पहिले जमाना चांगला होता, मॅगी 2 मिनिटात व्हायची. आधी आम्ही फार फार मॅगी खायचो. आणि गैरसमजही 2 मिनिटात होऊन जायचे. आता जमाना बदललाय. आता मॅगी 2 मिनिटात होत नाही. त्यामुळे गैरसमजही लवकर शिजत नाहीत. त्यामुळे आम्ही आता मॅगी खाण्याचं डोक्यात ठेवत नाही. कारण मॅगी खाताना झालेला गैरसमज फार काळ टिकतो असं एका तज्ञांनी सांगितलं आहे. तज्ञांना मॅगी आवडते. मॅगीला शिजायला वेळ लागतो, पण तज्ञांना तेवढा वेळ नसतो. कुणाचा गैरसमज नको म्हणून तज्ञ मॅगी कच्चीच खातात. त्यातला मसाला खात नाहीत. तज्ञ कच्ची मॅगी खातात म्हणून त्यांना नवनवीन जावईशोध लागतात. आम्हाला विचित्र जावईशोध आवडत नाहीत म्हणून आम्ही कच्ची मॅगी न खाता कधी कधी मसाला खातो. त्यामुळे तज्ञांचा गैरसमज होत नाही, झाला तरी तो लवकर दूर होतो. आम्ही आता कच्ची मॅगी खात नाही, कारण कच्ची मॅगी तर तज्ञ खातात ना. कधी कधी जावईशोध लवकर लागावा यासाठी तज्ञ आमच्या मसाल्याच्या पुड्या खातात. ते आम्हाला कधी कधी आवडत नाही. आवडत नसलं तरी आम्ही जाऊन मॅगी आणतो. यावेळी तज्ञ आधीची मॅगी खाण्यात व्यस्त असल्याने आमची मॅगी 2 मिनिटात होते त्यामुळे तज्ज्ञांचा गैरसमज होतो. आम्ही तरीही मॅगी खातो. कारण आम्हाला फार कच्ची आणि फार शिजलेली मॅगी आवडत नाही. कारण मॅगी खाल्ल्याने गैरसमज होतो.
😄
story #shortstory
Follow
Other Social Links