कॉकटेल जिंदगी -1 | Cocktail zindagi – 1

आज

कुणीतरी बरोबर म्हणलंय “लव्ह ईज इन दी एअर”, हातातल्या वाईनच्या ग्लासकडे टक लावून बघता बघता कौशिक पुटपुटला. खरंय, पण त्यात काही ग्रॅव्हिटीच नसेल तर ते तुम्हाला जमिनीवर यायला भाग पाडतं, पार्टी टेबलवर त्याच्या समोर बसलेला सत्यप्रताप सारकास्टिकली म्हणाला, अन स्टेजवर अनाऊन्समेंट झाली प्रोजेक्ट ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू, कौशिक अँड टीना, टिनाने गर्रकन मान वाळवून कौशिककडे कटाक्ष टाकला. बट्ट्याबोळ, मी पार्टीतून निघून जाऊ का?, बॉसला सांगितलं होतं मी फंक्शनला येऊ शकणार नाही म्हणून, कौशिक आगतिकपणे विचारणार तोच सत्यप्रतापने त्याच्या खुर्चीवरुन उठून कौशिकचा हात आपल्या हाताने उंचावला. येxxxx काय करतोयस?, कौशिक त्याच्या टेबलच्या डावीकडे चार टेबल सोडून बसलेल्या टिनाकडे बघत हळू आवाजात त्रासिकपणे पुटपुटला, मेहनत घेतली आहेस वर्षभर यासाठी निदान त्यासाठी नाटकं न करता स्टेजवर जा, सत्यप्रताप कौशिकच्या कानात पुटपुटला. एम्प्लॉइज ना कंपनी तर्फे दिल्या जाणाऱ्या महत्वाच्या अवॉर्ड पैकी महत्वाचा अवार्ड यावर्षी कौशिकच्या नावे झाला होता, सत्यप्रताप (त्याचा मित्र कलीग )डिरेक्टली जरी प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व नसला तरी कौशिकला वर्षभर मेहनत करताना त्याने पाहिलं होतं. कौशिक स्टेजवर गेला मागोमाग टिनाही पोहोचलीच, कंपनीच्या 4 ब्रांचेसची एकत्रितपणे अवॉर्ड सेरीमनी साजरी होत होती, दोघेही स्टेजवर पोहोचताच वेगळाच शॉट झाला, पाहुण्यांना कोणाचा तरी व्हिडीओकॉल आला, कॉल महत्वाचा असावा बहुदा त्यामुळे प्रमुख पाहुणे मंडळी अन त्यांचा ताफा पुढचा कार्यक्रम होल्डवर ठेऊन बॅकस्टेज निघून गेली.

इव्हेंट अरेंजमेंट करणारी काही टाळकी स्टेजवरुन ये जा करु लागली, बॅकस्टेजला असलेला इव्हेंट को- ऑर्डीनेटर सत्यप्रतापचा चांगला मित्र असल्याने त्याने कॉल करुन परिस्थिती जाणून घेतली, प्रमुख पाहुणे बिझी मनुष्य असल्याने पुढच्या अर्धा पाऊण तासासाठी सेरीमनी होल्डवर ठेवण्यात आली होती. ‘उपस्थितांनी स्टेजवरच थांबावं, होल्डसाठी क्षमस्व’ अशा आशयाची अनऊन्समेंट झाली, स्टेजवरुन कौशिकने सत्यप्रतापकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला कारण ना इलाजास्तव कौशिकला पुढचा अर्धा ते पाऊण तास टिनासोबत स्टेजवरच थांबावं लागणार होतं, एवढ्यात इव्हेंटवाला व्हॉलेंटीअर बसण्यासाठी खुर्च्या घेऊन येताना दिसला, आता तर कौशिकला फारच अवघडल्यासारखं झालं, ऍडिशन म्हणून की काय बॅकग्राऊंडला रोमँटिक म्युझिक ही चालू झालं. झाल्या प्रकारामुळे समोरच्या ऑडियन्समध्ये थोडा वैतागलेपणा आला होता, काही मंडळींचा फोकस स्टेजवरुन डायव्हर्ट होऊन लॉन पासून थोड्या अंतरावर असलेल्या बुफेकडे जाऊ लागला, काहींचा त्या पलीकडे असलेल्या बार काऊंटरकडे जाऊ लागला, ऑडियन्स थोडं रिलॅक्सेशन मोड मध्ये जाऊ लागलं दरम्यान रात्रीचे पावणे दहा वाजले होते. वारं सुटलं होतं, पण पावसाळा असला तरी पावसाचं चिन्ह नव्हतं.

Advertisements

ओके, ओके, नो इश्यू. कौशिकच्या नजरेला नजर देत सत्यप्रतापने इव्हेंट को- ऑर्डीनेटरचा कॉल कट केला. आता सत्यप्रतापला ही स्टेजवर जाता येईना त्यामुळे तो समोर ठेवलेली व्हिस्की संपवण्यात गर्क झाला, 2-4 पेग झाल्यावर त्याच्या समोर स्टेजवर बसलेल्या कौशिक कडे बघून त्याला 1 वर्षाखाली भावनांच्या गुंत्यात अडकलेला असलेला कौशिक आठवला, दोष त्याच्या एकट्याचा नव्हता म्हणा, बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरल्या यासाठी.

काही दिवसांखाली

काय चाललंय सत्यप्रताप धाराशिवकर, बरेच टेन्शनमध्ये दिसताय?, डोळे पेंगायलागलेत तुमचे, झोप झाली नाहीये काय 2 – 3 रात्री?. सत्यप्रतापची बॉस, मैत्रीण, अन कंपनीची सीईओ असलेल्या अवनी सिघांनीयाने काळजी कम टोमणे मारण्याच्या स्वरात विचारलं. सत्यप्रताप तरीही पेंगतच होता, “धाराशिवकर, काय म्हणते मी?”, या वेळेस अवनीचा आवाज चढला होता, सत्यप्रताप भानावर आला. येस मॅडम, नाही ते काल समीक्षाच्या सेंडॉफ पार्टीत….. माहीत आहे मला काल काय झालं ते तुम्हाला घरी मीच ड्रॉप केलं रात्री आठवतंय का काही ? त्याचं बोलणं मधेच तोडत अवनी म्हणाली. मैत्रीण असली तरी ऑफिसमध्ये निदान तिच्या केबिनमध्ये तरी अवनी त्याची बॉस होती, येस मॅडम मी प्रोजेक्टची आऊटलाईन आणि प्रोजेक्टच्या टीम फायनलायझेशनवर इतरांसोबत डिस्कशन करुन तुम्हाला दुपारपर्यंत रिपोर्ट देतो, मी, येतो मॅडम. एवढं बोलून सत्यप्रताप अवनीच्या केबीन मधून बाहेर पडला आणि स्वतःच्या डेस्कवर जाऊन बसला, आणि डेस्कवरच झोपी गेला.

Advertisements

लंच ब्रेक झाला सत्यप्रताप, कौशिक, समीक्षा, ध्रुवीका, अमनपाल, आणि श्रीमयी ऑफिस कॅफेटेरियाच्या राऊंडटेबलवर अपकमिंग प्रोजेक्टची चर्चा करत बसले होते. कॅफेटेरियात वर्दळ होती, इतर डिपार्टमेंन्ट्स चे एम्प्लॉइज आपापल्या डिपार्टमेंट्सच्या कलिग्सबरोबर घोळका करुन बसले होते, काही अतिउत्साही मंडळी कॅफेटेरियाच्या वॉलवर लटकलेल्या एलईडी मध्ये तोंड घालून कोणती तरी टेस्ट मॅच बघण्यात गर्क होते, एलईडीच्या शेजारीच सेल्फ सर्व्हिस नावाचा भलामोठ्ठा बोर्ड लावला होता. ब्रेक असला तरी काही कामानिमित्त टीना अवनीसोबत ऑफिसमध्येच थांबली होती. कौशिक, श्रीमयी आणि अमनपाल लॅपटॉपवर काहीतरी शोधण्यात गुंगून गेले होते, “कुणाला डोसा हवाय? आय एम हंग्री, येस एनिबडी?, खुर्चीवरुन उठत समीक्षा म्हणाली, सत्यप्रताप, श्रीमयीने हात उंचावला, लपटॉपवरुन नजर न हटवता अमनपालनेही हात उंचावला, समीक्षा कॅफेटेरियाच्या किचन काऊंटरकडे जाण्यासाठी वळली, “वन ब्लॅक कॉफी फॉर मी, मागून ध्रुवीकाने ऑर्डर सोडली.

एवढ्यात कॅफेटेरियात टिनाची एंट्री झाली, कबसे बैठे हो यार क्या चल रहा है?, यु शुड हॅव कॉल्ड मी ध्रुवीका फॉर लंच, ऍटलिस्ट मला बॉसला काहीतरी सांगून बाहेर पडता आलं असतं, टीना वैतागून म्हणाली. या या व्हाय नॉट, कम सीट लंच इज वेटिंग फॉर यु, ध्रुवीका सारकास्टिकली म्हणाली. व्हाय डोन्ट यु शिफ्ट टू अनादर चेअर मला कौशिकपाशी बसायचंय, टीना ध्रुवीकाला प्रत्युत्तर देत म्हणाली. हं, व्हाय नॉट बेंचोर टेबलवरच बसा, आलेच मी माझी माझी ब्लॅककॉफी घेऊन येते, तेवढीच समीक्षाला थोडी मदत, नाहीका?’, कौशिक कडे बघता बघता ध्रुवीका तिच्या कौशिक शेजारच्या खुर्चीतून उठून कॅफेटेरियाच्या किचन काऊंटर कडे निघून गेली. ग्रुपमध्ये सब ग्रुपीझम झालं होतं, कारण ध्रुवीकाच्या मते टिना स्वतःमध्येच एक कन्फ्युज झालेलं व्यक्तिमत्व होतं, तिला स्वतःलाच कळत नव्हतं की तिचं कौशिकवर नक्की प्रेम आहे की कौशिकसाठी ती जे फील करते ते फक्त एक ऍट्रॅक्शन आहे, तर दुसऱ्या बाजूला कौशिकला समीक्षाबद्दल तीव्र ओढ होती नव्हे ते प्रेमच होत, आणि त्यामुळेच टिनाला ध्रुवीका फारशी पचत नव्हती कारण तीचा आणि समीक्षाचा कॉलेजपासूनचा याराना सगळ्या ऑफिसला माहीत होता. अजूनही कौशिक लॅपटॉप स्क्रीनमधून बाहेर पडला नव्हता, अं, कौशिक, अवनी मॅडमनी काही चेंजेस सुचवले आहेत ही त्याची लिस्ट, हातातली प्रोजेक्टची फाईल कौशिककडे देत टीना म्हणाली. एवढ्यात समीक्षा आणि ध्रुवीका लंच ऑर्डर घेऊन आल्या, ओ मॅडम जरा हात लावा प्लेट सर्व्ह करायला’, ध्रुवीका आणि टीना परत चालू झाल्या, इट्स ओके – ओके गिव्ह् मी दॅट खुर्चीतून उठून टिनाच्या हातातली प्लेट घेता घेता कौशिक म्हणाला. प्लेट्स सर्व्ह करुन तो परत लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसला, टिनाला हे खटकलं. रोजच्या प्रमाणेच अत्यंतिक खेळीमेळीच्या वातावरणात दुपारच्या कॅफेटेरियातला लंच चालू होता, अमनपाल, श्रीमयी अन समीक्षा कोणत्यातरी विषयावर गप्पा ठोकता ठोकता जोर जोरात हसत होते. सत्यप्रताप जास्त काही बोलत नव्हता तो मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसला होता. सत्या ऐक ना, बॉसने 3 – 4 मेल फॉरवर्ड करायला सांगितलेत तेव्हढं तू कर ना ? विल यु डू दॅट प्लिज ?, कौशिकच्या समोरचा लॅपटॉप सत्यप्रतापकडे सरकवत टीनाने रिक्वेस्ट कम ऑर्डर दिली. 15 – 20 मिनिटं अशीच गेली, हं, लिसन एव्हरीबडी वि निड टू फायनलाईझ द टीम आय मिन वी आर डूईंग टीम सेगमेन्टेशन बाय डिव्हायडिंग अँड असायनिंग द प्रोजेक्ट टिम्स ऑफ टू मेंबर्स, बीकॉझ अवनीने सांगितलंय की 2 च जणांची प्रोजेक्ट टीम बनवता येणार आहे, हेड ऑफिसकडून तसं कळवण्यात आलंय, बी रेडी गाईज प्राईझ अमाऊंट पण हाय आहे या वर्षी, पण एक ड्रॉबॅक असा आहे की यात बऱ्याच टिम्स पार्टीसिपेट करणार आहेत आणि एलिमीनेशन आहे.

सगळ्यांचे चेहरे पडले, ठीक आहे आपण एक काम करु टिम्स तुम्ही आपापसात डीसाईड करा आणि मला कळवा नाहीतर अवनीला कळवा, ओके वेल देन मी निघतो मला बॉसने प्रोजेक्टच्या इतर कामानिमित्त केबीन मध्ये बोलावलं आहे, टीना ते मेल मी फॉरवर्ड करुन ठेवले आहेत, खुर्चीवरुन उठत सगळ्यांकडे आळीपाळीने बघता बघता सत्यप्रताप म्हणाला आणि कॅफेटेरियातून निघून गेला. झालं, टीम डीसाईडेशन वरुन टीना व्हर्सेस ध्रुवीका आणि समीक्षा बरंच वाकयुद्ध रंगलं ते पार अगदी एकमेकांची तोंडं न पहाण्यापर्यंत जाऊन पोहोचलं, वादावादी मिटवता मिटवता श्रीमयी आणि अमनपालची दमछाक झाली, वाद तात्पुरता शांत झाला होता, कौशिक यात काही बोलला नाही कारण त्याला चांगलं माहीत होतं वाद कशामुळे चालला आहे ते, डोकं फिरल्यामुळे टीना आणि समीक्षा दोघीही कॅफेटेरियातून निघून गेल्या दोघीही कोणाचं ऐकायच्या मनस्थितीत आहेत असं कौशिकला वाटलं नाही, त्यामुळे तो ही समजवायच्या भानगडीत पडला नाही. मी, आलेच ध्रुवीकाच्या पाठोपाठ बाहेर पडताना श्रीमयी म्हणाली. झालेल्या वादवादीमुळे कौशिकचं डोकं जड झालं, सिगारेटच्या पाकिटातली एक सिगारेट त्याने लाईट केली, अमनपालने सहानुभूतीपूर्वक कौशिककडे बघितलं, वेगळीच शांतता पसरली होती, त्यामुळे पाठोपाठ अमनपालनेही एक सिगारेट लाईट केली, दोघेही सिगारेटचे झुरके मारण्यात गुंगून गेले.

CAUTION: Smoking or consuming Alchohol is injurious to health.

क्रमशः

© ऋषिकेश पंचवाडकर

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s