दुसरा दिवस उजाडला, ऑफिसमध्ये वर्दळ होती, प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र होता, कौशिक, अमनपाल आणि ध्रुवीका कामानिमित्त आउट ऑफ ऑफिस गेले होते. ऐक ना एक काम कर समीक्षा आणि टिनाला माझ्या केबीनमध्ये पाठवून दे, अवनीने भावेश नावाच्या ऑफिस पियूनला ऑर्डर दिली, झालेली वादावादी सत्यप्रतापच्या आणि पर्यायाने अवनीच्या कानावर पडली होती. ” येस मॅडम? यु कॉल्ड ? समीक्षा अवनीच्या केबीनमध्ये शिरत म्हणाली. येस समीक्षा प्लिज हॅव ए सीट, मोबाइलवर कोणत्यातरी कॉलवर बोलता बोलता अवनीने समीक्षाला बसायला सांगितलं, पाठोपाठ टिनासुद्धा केबिनमध्ये आली, अवनीने तिलाही हाताने खूण करुन बसायला सांगितलं, ‘ओके सर माय टीम विल ट्राय देअर बेस्ट, एवढं म्हणून अवनीने कॉल कट केला. गर्ल्स, व्हॉट्स द मॅटर?, कानावर पडलंय माझ्या तुमचं काय चाललंय ते, सत्यप्रतापला मी कामानिमित्त बाहेर पाठवलं आहे…… त्यांच्यात संभाषण चालू असताना केबिनचा दरवाजा बंद झाला दाराआडची चर्चा तात्पुरती तरी बंद दाराआडच राहिली. नाही रे मला माहित नाही, मी माझी माझी प्रोजेक्टची कामं करण्यात बिझी होतो आणि खरंतर मलाही जाणून घ्यायचं होतं, सँडविचचा बाईट चावता चावता कौशिक सत्यप्रतापकडे बघून म्हणाला, कमॉन कौशिक समीक्षा तुला काहीच बोलली नाही का ? अवनी तिला आणि टिनाला काय बोलली ते?, सत्यप्रतापने न रहावून विचारलं. आमच्यात निदान सध्यातरी या विषयावर संभाषण झालेलं नाही. दुपारची वेळ होती लंच टाईम व्हायच्या आधीच सत्यप्रताप, कौशिक, श्रीमयी आणि अमनपाल कॅफेटेरियात बसले होते, प्रोजेक्टचं काम आज जोरात चाललं होतं. टीममध्ये कौशिक फिक्स होता, आता फक्त दुसरा मेंबर ऍड व्हायचा अवकाश होता, तसं बघायला गेलं तर या संदर्भातला निर्णय कौशिकने घ्यायला पाहिजे होता परंतु ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीत फर्मली निर्णय घेणारा कौशिक आज स्वतःच द्विधा मनस्थितीत होता, त्याला समजत नव्हतं कोणाला प्रोजेक्ट पार्टनर करुन घेता येईल. एका विशिष्ठ प्रकारच्या मानसिक गुंत्यात हे लव्ह ट्रँगल अडकलं होतं, याआधीही या टोळक्याने, सॉरी या ट्रँगलने अशा प्रकारची परिस्थिती यथायोग्यरित्या हाताळली होती, पण का कोण जाणे यावेळी परिस्थिती जरा वेगळी आणि बिकट वाटत होती आणि या वेळेस निमित्त मात्र फक्त प्रोजेक्टचं झालं होतं. ग्रुपमध्ये ट्रँगल सोडून प्रत्येकाला ग्रुपमधल्या वातावरण बदलाचा अनुभव अधल्या दिवशीच आला होता त्यामुळे इतर कोणताही मेंबर या संदर्भात जास्त काही बोलताना दिसत नव्हता.
ग्रुपमध्ये रुसवे फुगवे वाढू लागले, एक दिवस तर रागावलेल्या समीक्षाची समजूत काढता काढता कौशिकच्या नाकीनऊ आले होते, हे समजल्यावर टीना आणखीनच नाराज झाली त्यामुळे नंतर कौशिकला तिची समजूत काढावी लागली. ह्या सगळ्या परिस्थितीत कौशिक एकटा पडत चालला होता. ” मी काय म्हणतो सत्यप्रताप मी च हा प्रोजेक्ट सोडून देतो म्हणजे कसं ?, एक दिवस वैतागून कौशिक म्हणाला. सत्यप्रतापला ही सगळी परिस्थिती माहीत असूनही काही करता येत नव्हतं तरीही तो त्याच्यापरीने कौशिकला धीर देत होता. त्याला माहित होतं की समीक्षावर असलेल्या प्रेमाखातर त्याला तिला नकार देत येत नव्हता ज्याची कल्पना तिलाही होती आणि एका बाजूला टीना होती जी कौशिकची चांगली मैत्रीण होती त्यामुळे कौशिकला तिलाही नकार देणं जड जात होतं. त्यामुळे अतिशय फिल्मी टाईप वातावरण ग्रुपमध्ये झालं होतं.
होणाऱ्या वादवादीला कंटाळून समीक्षा या प्रोजेक्टमधून माघार घेते की काय अशी शंका सत्यप्रताप आणि कौशिकच्या मनात येऊन गेली, आणि शेवटी झालंही तसंच, विकेंडच्या निमिताने दुसऱ्यादिवशी संध्याकाळी ग्रुप एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी जमला होता, प्रत्येकजण आपापल्या तंद्रीत असला तरी वातावरणात थोडा तणाव होताच, टेबलवर ठेवलेला समीक्षाचा फोन जोरजोरात व्हायब्रेट होऊ लागला, चेक करण्यासाठी समीक्षाने फोन उचलून हातात घेतला आणि तातडीने कौशिककडे एक कटाक्ष टाकला, तसं कौशिकचं लक्ष होतंच समीक्षाकडे पण तो ध्रुवीकशी ऑफिसच्या गप्पा मारण्यात व्यस्त होता. ‘ मी, आलेच जरा कॉल अर्जंट आहे म्हणत समीक्षा समीक्षा तिच्या खुर्चीवरुन उठून रेस्टॉरंटच्या बाहेरील बाजूस असलेल्या लॉनवर जाऊन कॉल अटेंड करू लागली. ‘ हॅलो ?, हो बोलतीये, ओह व्हॉट ए प्लेझंट सारप्राईझ हिमांशू आय सिरियसली नेव्हर एक्सपेक्टेड दॅट यु विल कॉल, खूप बरं वाटलं तुझा आवाज ऐकून, कसायस?, शुअर व्हाय नॉट, भेटूया की परवा सकाळी येते एअरपोर्टला तुला पिक अप करायला ओके, एवढ्यात समीक्षाच्या मोबाईलवर अजून एक कॉल वेटिंगवर पडला, समीक्षाने तो चेक केला, कॉल कौशिकचा होता. ‘ बरं ऐक ना मी सध्या जरा वेगळ्या मीटिंगमध्ये आहे बाकीच्या गप्पा भेटल्यावर मारुयात, बरंच बोलायचं आहे तुझ्याशी. गप्पा 5 मिनिटांवरुन 15 मिनिटांवर रंगत गेल्या, गप्पांच्या ओघात समीक्षाला डिनरचा विसर पडल्यासारखा झाला होता, कॉलेजच्या आठवणींत समीक्षा थोडी गुंगून गेली होती. डिनर ऑलमोस्ट सर्व्ह व्हायला आलं होतं, “अं श्रीमयी ( श्रीमयीला ऐकू गेलं नाही, ती मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसली होती ), “श्रीमयी (अवनीने किंचित जोरात हाक मारली), ऐक ना बाहेर जाऊन जरा समीक्षाला बोलावून आण ना, या शुअर, आलेच श्रीमयी खुर्चीतून उठत म्हणाली आणि लॉनच्या दिशेने निघून गेली. “तुझ्या अजूनही लक्षात आहे तो कॉलेजवाला किस्सा, कॅन्ट बिलिव्ह, नो आय मीन सिरियसली, समीक्षा बोलता बोलता जोरात हसली आणि उलट्या दिशेला वळली, समोर श्रीमयी तिच्याकडे पहात उभी असलेली समीक्षाने पाहिलं, ” ओक्के हिमांशू, वी विल मीट डे अफ्टर टूमारो ऍट दी एअरपोर्ट ओके?, या. येस. चलो बाय, म्हणत समीक्षाने कॉल कट केला. श्रीमयीला किंचितसं टाळत समीक्षा रेस्टॉरंटच्या एट्रंन्सच्या दिशेने चालत जाऊ लागली, “अर्धा तास झाला आम्ही वाट बघतोय, तू 5 मिनिटं म्हणून सांगून अली होतीस समीक्षा ?, श्रीमयीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती तरीही कॉल कोणाचा होता तिने विचारलं नाही, “नो ईश्यू श्रीमयी कॉल अर्जंट होता घ्यावा लागला, तुझी ही सगळी कारणं आहेत ना ती बॉस नसताना देत जा, बघितलेल्या दृष्याबद्दलची मनातली शंका झटकता झटकता श्रीमयी चेष्टेच्या सुरात म्हणाली, दोघीही डिनरसाठी आत निघून गेल्या.
“मॅम मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, समीक्षा म्हणाली. हो बोल ना, व्हॉट्स द मॅटर, काही सिरीयस आहे का?, अवनीने प्रतिप्रश्न केला, “नाही मला एकांतात बोलायचं आहे. नॉट अ बिग डील, इथे सगळे आपलेच आहेत, अवनी थोडं सिरीयस होत म्हणाली. नाही मॅडम विषय थोडा महत्वाचा आहे, इतरांशी मी तो बोलेनच पण त्याआधी मला तो तुमच्याशी बोलणं गरजेचं वाटतंय, वातावरणात किंचितसा गंभीरपणा आला, ग्रुपमधील प्रत्येक मेम्बर एकमेकांकडे बघू लागला, “शुअर समीक्षा, आपण एक काम करु आपण हा विषय उद्या बोलू, मी तुला सकाळी ऑफिससाठी पिकअप करायला येते, चालेल?. हो चालेल, समीक्षा म्हणाली. वातावरणातला वाढता सिरियसनेस लक्षात घेऊन, अमनपाल आणि ध्रुवीकाने एकापाठोपाठ एक जोक मारले, वातावरण थोडं निवळलं, तो कोणता विषय आहे? यावर आपापल्या परीने विचारमंथन करता करता प्रत्येकाचं डिनर पार पडलं. समीक्षा मात्र बरीचशी कॉन्फिडेन्ट झाल्यासारखी वाटत होती, कसलातरी महत्वाचा निर्णय घेऊन आल्यासारखी, कॉल एटेंड करुन आल्यापासून ती कसल्यातरी विचारात हरवल्यासारखी वाटत होती.” काय समीक्षा कसला विचार करतीयेस?”, न राहवून ध्रुवीकाने विचारलं. काही नाही प्रोजेक्टबद्दल विचार करत होते, हातातली बिलाची कॅश बिलिंग पॉकेटमध्ये ठेवता ठेवता समीक्षा म्हणाली. ” नक्की प्रोजेक्टबद्दलच की आणखी कोणत्या वेगळ्या विषयाबद्दल?”, ध्रुवीकाने प्रतिप्रश्न केला, ध्रुवीकाला थोडा संशय आला होता, तिला आलेला कॉल कोणाचा होता याबद्दल ध्रुवीका तिला विचारणारच होती, पण एवढ्यात समीक्षाने विषयांतर केलं, त्यामुळे विषयाला तात्पुरता तरी पूर्णविराम मिळाला होता.
“हॅलो, येस मी थांबलीये गेटच्या बाहेर, लवकर ये, समीक्षाच्या घराबाहेर अवनीची कार थांबली होती. सकाळचे 9:30 वाजले होते, आज सगळ्याची मॉर्निंग शिफ्ट होती, प्रोजेक्ट्सच्या टीम फायनलाईझ होणार होत्या. “येस मॅम लेट्स गो, गडबडीने अवनीच्या कारमध्ये बसत समीक्षा म्हणाली, कार ऑफिसच्या दिशेने निघाली. ‘सॉरी मॅम मला थोडा लेटच झाला, काल थोडी लेट झोप लागली, आय मिन टू से थोडी उशिरा झोपले काल मी, आय वॉज मेकिंग अप माय माईंड फॉर सम सर्टिन थिंग्स दॅट्स व्हाय. “इट्स टोटली ओके समीक्षा, समटाईम्स ईट हॅपन्स विथ मी अल्सो, कॉफी घेऊयात, येस कॉफी घेऊचयात, समीक्षा मूळ-मुद्द्याला हात घालणार तोच अवनीने तिच्या नेहमीच्या रेस्टॉरंटच्या थोडी पुढे नेऊन गाडी उभी केली. ‘हं आता बोल काय विषय आहे? काय बोलायचं होतं तुला? कॉफीचा पहिला घोट घेताना अवनीने समीक्षाला प्रश्न केला. ‘गेल्या आठवड्यात प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशनची एनाऊन्समेंट झाल्यानंतर माझ्यात आणि टीनामध्ये बरीच वादावादी झाली, तुम्हीही तुमच्या परीने वाद मिटवण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही त्यावेळी म्हणाला होतात की समबडी हॅज टू स्टेप बॅक फ्रॉम धिस प्रोजेक्ट, मी यावर बराच विचार केला आणि शेवटी मी हा प्रोजेक्टमधून बॅकआउट करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ग्रुपमधले वादविवादसुद्धा कमी होतील, बेटर लक नेक्स्ट टाईम. समीक्षाच्या निर्णयाने अवनीला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, पण तिने तसं दाखवलंही नाही, ” आय थिंक यु मस्ट थिंक अबाउट धिस अगेन, अवनी शांततेत म्हणाली. नो मॅम मी बऱ्याच विचारांती हा निर्णय घेतलेला आहे, अँड इट विल बी बेटर फॉर मी ऍज वेल ऍज द टीम अल्सो. समीक्षाने आपला निर्णय सांगून टाकला. “सो यु विल नॉट बी ईन प्रोजेक्ट टीम धिस इअर?, अ नो मॅम इट्स ओके इट विल बी फाईन, आय विल बी फाईन. ” यु शुअर अबाउट धिस?, कारमध्ये बसायच्या आधी अवनीने अजून एकदा प्रश्न विचारला. समीक्षाने फक्त सकारात्मक मान हलवली. सगळ्यांचाच पुढचा अख्खा दिवस बऱ्यापैकी गुंतागुंतीचा जाणार होता. टीम फायनलाईझ झाली कौशिकसोबत यावेळी टीना असणार हे निश्चित झालं. ” तुझं यावर काहीच म्हणणं नाही का समीक्षा?, एकतर्फी निर्णयाच्या रागातून कौशिकने प्रश्न विचारला. “माझ्यासाठी हा टॉपिक, वाद झाला त्याच दिवशी संपलेला होता, अतिशय थंडपणाने समीक्षाने उत्तर दिलं. ‘ पण का? गेल्या वर्षी टीना नव्हती?, आपण सलग 3 वर्ष प्रोजेक्ट पार्टनर आहोत, याच वर्षी असं काय झालं की तू बॅकआउट करत आहेस?, कौशिकचा आवाज चढला होता. नथिंग दॅट मच सिरीयस कौशिक, नवीन एम्प्लॉइजना सुद्धा संधी मिळायला हव्यात असं अवनी मॅमचं म्हणणं आहे त्यांनी त्यादिवशी मला केबीनमध्ये तसं बोलूनही दाखवलं आहे, त्यामुळे हा निर्णय माझ्या एकटीचा नाहीये, समीक्षा अतिशय शांततेत आणि कॉन्फिडन्सनी थाप मारत होती. “ओह वेल देन मग तर मी ही या प्रोजेक्टमध्ये राहून काही उपयोग नाहीये कारण मी तरी कुठे नवीन एम्प्लॉयी आहे, नाही का?, कौशिक समीक्षाच्या नजरेला नजर देत म्हणाला. पण तुझं कॅलिबर माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे आणि तु ते गेल्या 3 वर्षात प्रुव्ह करुनही दाखवलं आहेस त्यामुळे तू या प्रोजेक्टसाठी महत्वाचा एम्प्लॉयी मेंबर आहेस, त्यामुळेच तू ह्या प्रोजेक्टमध्ये असणं फार गरजेचं आहे, आणि हा सुद्धा अवनी मॅमचाच डिसीजन आहे, समीक्षा नजर चोरत म्हणाली. एवढ्यात समोरुन टीना कौशिकच्या डेस्ककडे चालत येत असलेली कौशिकने बघितलं, आता मात्र कौशिकचा नाईलाज झाला, ती येऊन काही बोलणार एव्हढ्यात कौशिक स्वतःच्या डेस्कच्या खुर्चीतून उठत टिनाशी काहीही न बोलता बाहेर निघून गेला, ” काय हा मुलगा?, टिना स्वतःशीच पुटपुटली, ” काय झालंय? टीनाने समीक्षाला भुवया उडवत विचारलं, समीक्षाने स्वतःच्या शेजारची कौशिकची खुर्ची ओढून टिनाला त्यावर बसण्यासाठी सांगितलं, अतिशय डिटेलमध्ये तिला झालेला रिकॅप समजावून सांगितला, “इफ यु वॉन्ट टू वर्क फॉर धिस प्रोजेक्ट देन टेल मी, आय शाल बॅकआउट फॉर यु, काही उपयोग नाहीये मला अशीही दुसरी बरीच महत्वाची कामं आहेत टीना, टिनाचं बोलणं मध्येच तोडत समीक्षाने टिनाला गप्प बसवलं. ” ओके वेल देन, मी निघते कॅफेटेरियात भेटूया, समीक्षाच्या बोलण्याचा फारसा फरक न पडल्यासारखं दाखवताना टीना म्हणाली, आणि ऑफिस बाहेर पाडण्यासाठी खुर्चीतून उठली. मनातून टिनाला बऱ्याच उकळ्या फुटायला सुरुवात झाली होती, समीक्षाचा मुड मात्र गेला होता, इतक्यात समीक्षाच्या मनात हिमांशूचा विचार क्लिक झाला, का कोण जाणे त्या विचारामुळे समीक्षा थोडी सुखावली तिच्या डोक्यातला ताण थोडा हलका झाला, “झिंदगी कॉकटेल है बेंचो”, स्वतःच्या पीसी सिस्टीमचा मेन स्विच बंद करुन तिच्या खुर्चीतून उठत समीक्षा स्वतःशीच पुटपुटली आणि कॅफेटेरियाकडे जाण्यासाठी निघाली.
क्रमशः
CAUTION: Smoking or consuming Alchohol is injurious to health.
® ऋषिकेश पंचवाडकर
- Career Paths After Pursuing A Finance Degree.
- One liner #25
- Blog page on Content writer.
- A Dreamy Night
- One Liner #24