“येस आय नो मम्मी, माझ्या लक्षात आहे उद्या किर्ती आंटीच्या मुलाचं लग्न आहे ते, तू सारखी सारखी आठवण करुन द्यायला फोन करु नकोस, दिवसभरात ढीगभर कामं करुन मी आत्ता थोडासा रिलॅक्स झालोय, घरी आल्यावर बोलू, बाय.” आधीच वैतागलेल्या कौशिकने कॉल कट केला.
” ध्रुवीका ?, सत्यप्रतापला फोन कर जरा, मला त्याच्या बरोबर अर्जंटली हेड-ऑफिसला जाऊन यायचं आहे महत्वाचं काम आहे, कॅफेटेरियातल्या नेहमीच्या बसायच्या टेबलकडे समीक्षाला येताना बघून कौशिक म्हणाला”, ” ध्रुवीका? श्रीमयी कुठे आहे ? माझा लंचबॉक्स तिच्याकडे आहे, असेल तिथून बोलवुन घे तिला, कशाचं काही पडलं नासल्यासारखं करत समीक्षा म्हणाली. “अबे सकाळपासून बॉसनं दिलेली खंडीभर कामं आहेत यार प्रत्येकाला कुठं अटेंड करत बसू, मला माहित नाही समीक्षा श्रीमयी कुठे आहे ते, ए अमन उसे कॉल कर यार मुझे भी वो यहा मदत के लिये लागनेवाली है, फ्रस्टेट होऊन ध्रुवीका म्हणाली, आज सकाळपासून ध्रुवीका समीक्षाशी जास्त बोलली नव्हती, पण समीक्षाचं या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही तिचं मन सध्या हिमांशूच्या कॉलने व्यापलं होतं, एरवी कॅफेटेरियात समीक्षाचा वेळ ध्रुवीका अन श्रीमयीसोबत गॉसिप करण्यात जात होता, आज तसं काही होताना दिसत नव्हतं. श्रीमयीला बहुतेक काल आलेल्या कॉल बद्दल काहीतरी कुणकुण लागलेली दिसतेय या विचारातून समीक्षा गप्प बसली असावी बहुदा.
एव्हढ्यात सत्यप्रताप आलाच, ‘चलो, निघूत? 2 तास आहेत आपल्याकडे जाऊन यायला, मला अवनी काही बोलली नाही सकाळी मी तिच्या केबिनमध्ये होतो तेव्हा?, सत्यप्रताप कौशिककडे बघत म्हणाला. ‘अरे, नाही माघाशीच मॅम ने मला टेक्स्ट करुन सांगितलं आहे, तू बाहेर गेलेलास वाटतं ना, मॅमनी तुला कॉल पण केला होता पण आय थिंक तू उचलला नाहीस, नंतर मीसुद्धा तुला कॉल केला होता तो ही तू उचलला नाहीस, त्यामुळे मॅमनी मला सांगितलं, कौशिक म्हणला. ” ओह, शीट यार कौश्या आय कम्प्लिटली फॉर्गोट माझा फोन गाडीतच राहिला आहे, चार्जिंग कमी झालं होतं म्हणून मघाशी बाहेर जायच्या आधीच मी कार मध्ये चार्जिंगला लावला होता. चल चल लवकर, निघूत चल !, गडबडीत सत्यप्रताप म्हणाला. कौशिक आणि सत्यप्रताप कॅफेटेरियातून बाहेर पडले, कॅफेटेरियातून बाहेर पडताना मोबाईलमध्ये तोंड खुपसून चालत असलेल्या कौशिकला टीनाची धडक बसली आणि त्याचा मोबाईल खाली पडला, “फssssअक, आधीच फ्रस्ट्रेट असलेला कौशिक टिनाकडे बघत जोरात ओरडला, कॅफेटेरियात भयाण शांतता पसरली, सगळयांच्या नजरा तिघांवर खिळल्या, कौशिक तिच्याकडे खुनशी नजरेने बघत होता, टीना मात्र मनात उकळ्या फुटत असल्या तरी अतिशय प्रेमयुक्त भावनेने कौशिककडे बघत होती, गाईज प्लिज नंतर नंतर, हं,सत्त्या म्हणला, टिनाने तिचं हसू अवरायचा प्रयत्न केला, “हॅव यु गॉन मॅड,……कौशिक ओरडायच्याच बेतात होता तोवर सत्त्याने कौशिकला ओढून बाहेर नेलं.
“सत्त्या गाडी थांबव, त्याचा मोबाईल सायलेंट मोडवर टाकत कौशिक म्हणाला. ” काय ? पण का ? अरे अशाने लेट होईल आपल्याला हेड ऑफिसला जायला, आपण ऑलरेडी लेट झालो आहोत कौश्या”. “मला माहित आहे ते, तरी पण तू गाडी थांबव, आपल्याला कुठल्याही हेड ऑफिसला जायचं नाहीये, तसा कोणताही कॉल मला आला नव्हता, मला तुला फक्त ऑफिसमधून बाहेर काढायचं होतं त्यामुळे मला हे नाटक करावं लागलं, मला महत्वाचं बोलायचं आहे आणि मला ते सगळ्यांसमोर बोलता आलं नसतं, खासकरुन टीना आणि समीक्षासमोर तर नाहीच नाही”. सत्यप्रतापने गाडी रस्त्याच्या कडेला नेऊन उभी केली, “हं बोल काय झालं ?, गोंधळात का पडलायंस एव्हढा? हे बघ कौश्या मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे ते, आय नो या वर्षी समीक्षा तुझी प्रोजेक्ट पार्टनर नाहीये त्यामुळे तुझं या प्रोजेक्टमध्ये लक्ष लागत नाहीये, पण माझं ऐकशील तर तू एवढ्या गोंधळलेल्या अवस्थेत राहू नयेस असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण काय आहे तुझं गोंधळून जाणं हे आपल्या टीमसाठी आणि पर्टीक्युलरली तुझ्या करियर डेव्हलपमेंटसाठी फारसं फायद्याचं नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता तू या प्रोजेक्टवर काम करावंस अशी माझी तुला तुझा सिनियर म्हणून ऑर्डर आहे, ओके?”. एक दमात सत्यप्रताप बोलून गेला, कौशिकने नाईलाज झाल्यासारखी मान हलवली, समीक्षाने या प्रोजेक्टमधून बॅकआऊट केल्यापासून सत्यप्रतापचं कौशिक ऑफिसमध्ये काय काय कामं करतोय यावर बारीक लक्ष होतं. इथे माझ्या शब्दाला, माझ्या कल्पनांना आणि माझ्या मताला काही व्हॅल्यू नाहीये, समीक्षा असं का वागली असेल?, ग्रुपमधील एकही मेंबर या संदर्भात माझी बाजू का समजून घेत नाहीये? आशा प्रकारच्या संमिश्र भावना कौशिकच्या मनात उमटल्या, महत्प्रयासानं त्यानं आपलं रडू आवरलं, रॅशनली विचार करायला गेलं तर सत्यप्रताप बरोबर सांगत होता, पण त्याला हे माहिती नव्हतं की अधल्यादिवशी डिनर झाल्यानंतर सगळे जेव्हा आपल्या घरी जायला निघाले होते तेव्हा समीक्षाबरोबर कौशिकचं भांडण झालेलं, हे भांडण फारच कडक्याचं झालं, ज्याबद्दल आज सकाळपासून कौशिक आणि समीक्षा दोघांनीही इतरांसमोर ब्र ही उच्चारला नव्हता. पण यामुळे एक गोष्ट कौशिकच्या लक्षात आली होती ती म्हणजे समीक्षाचा कौशिकमधला इंटरेस्ट कमी झाला होता, आयुष्यातल्या प्रायोरिटीज बदलल्यासारखी समीक्षा त्यावेळी बोलत होती. हे कमी होतं की काय त्यातून सत्यप्रतापनेही कौशिकचं जास्त काही ऐकून घेतलं नाही त्यामुळे कमी होण्याच्या ऐवजी कौशिकच्या मनातला गोंधळ जास्तच वाढला होता. तसा कौशिक करियर ओरिएंटेड होता त्यामुळे तो लगेच भांडणातून सावरला पण अधल्यादिवशी झालेल्या भांडणाचं दुःख त्याच्या सल बनून राहिलं.
दुसरीकडे मात्र समीक्षाच्या मनातली परिस्थिती झपाट्यानं बदलत चालली होती, दुपार झाली होती सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले, कौशिक आणि सत्यप्रताप त्या संभाषणानंतर ऑफिसमध्ये येऊनसुद्धा तास दीड तास झाला होता. कौशिकच्या आणि समीक्षाच्या मधे एका डेस्कचं अंतर होतं समीक्षा तिच्या कामात गुंगून गेली होती, कौशिक मात्र अधून मधून समीक्षाचं काय चाललंय याचा धांडोळा घेत होता, एवढ्यात समीक्षाची नजर कौशिकवर पडली, कौशिकने नजर चोरली, थोडा वेळ असाच गेला. डेस्कवर ठेवलेला समीक्षाचा फोन व्हायब्रेट व्हायला लागला, कौशिकने अजून एक कटाक्ष समीक्षाकडे टाकला, यावेळेस समीक्षाने नजर चोरली, कौशिककडे लक्ष न देता समीक्षा तिच्या खुर्चीतून उठून ऑफिसबाहेरच्या कॉरिडॉरमध्ये गेली, ” हॅलो हा बोल ना हिमांशू, व्हॅट्स अप ?, “अगं काही नाही सहज सगळी कामं उरकून निवांत बसलो होतो सहज तुझी आठवण आली, रिमाईंडर कॉल केला, उद्या येतीयेस ना दुपारी एअरपोर्टवर पिकअप करायला ऑदरवाईज तुला जर ऑफिसची कामं असतील तर इट्स ओके आय विल मॅनेज समबडी एल्स”, ऑफ कोर्स येणार आहे मी, तू यायच्या आधी मी तिथे टच असेन”, समीक्षा उत्सुहकतेने म्हणाली.
कॉल करुन समीक्षा परत ऑफिसमध्ये आली, ती आनंदात दिसत होती, मात्र तिचा हसरा चेहरा पाहण्यासाठी कौशिक त्यावेळी जागेवर नव्हता, “व्हेअर ईज कौशिक?, ” डोन्ट नो मे बी सत्यप्रतापच्या केबीन मध्ये असेल, अमनपाल म्हणाला. समीक्षा शांतपणे आपल्या खुर्चीवर बसली, एवढ्यात टीना उठून सत्यप्रतापच्या ऑफिसकडे जायला निघाली, जाता जाता तिने समीक्षाकडे एक कटाक्ष टाकला आणि ती तशीच पुढे निघून गेली. कौशिकच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं खरं पण समीक्षाचा मात्र पुढचा सगळा दिवस आनंदात गेला. अखेर तो दिवस उजाडलाच. “मॅम आज जरा तब्येत खराब आहे मी आज ऑफिसला ऑफ घेत आहे, अं, हो हो गेल्यावर्षीच्या प्रोजेक्ट फाईल्स मी काल ऑफिसमधून बाहेर पडताना श्रीमयीकडे दिल्या आहेत ती देईल त्या फाईल्स टीनाला, येस शुअर शुअर, हो मी मारते एखादी चक्कर जर तसंच फार महत्वाचं काही असेल तर, येस मॅम”. समीक्षाने अवनीचा कॉल कट केला. दुपारचा दीड वाजला होता समीक्षा एअरपोर्टच्या बाहेर हिमांशूची वाट बघत थांबली होती. श्रीमयीला समीक्षाबद्दल आलेल्या संशयाबद्दलची थोडी भीती सोडल्यास समीक्षाला ग्रुपमधल्या इतरांबद्दलचं काही टेन्शन नव्हतं करण इतरांना तिने काही सांगितलंच नव्हतं, एअरपोर्टवर आल्यापासून समीक्षाचं जवळपास 3 वेळा श्रीमयीशी कॉलवर बोलणं झालं होतं, करण श्रीमयी कौशिक आणि टीनाला प्रोजेक्टमध्ये बाहेरुन असिस्ट करणार असं परवाच्या डिनरदरम्यान अवनीने श्रीमयीला सांगितलं होतं. समीक्षाचा मोबाईल व्हायब्रेट व्हायला लागला, कॉल हिमांशूचा होता,” येस हिअर हिअर, रोडच्या पलीकडे थांबलेल्या समीक्षाने हिमांशूला हात उंचावून खूण केली. “प्लेजर टू मीट यु समीक्षा”, समीक्षाला कॅज्युअली मिठी मारत हिमांशू म्हणाला, “व्हेरी मच डिलाईटेड टू मीट यू हिमांशू कित्ती वर्षांनी. “काय करणार ग्रॅज्युएशन नंतर जावं लागलं फॉरेनला, खरं सांगायचं तर झालं असं….”, ” ओ मॅडम जर इथेच थांबणार असाल तर गाडी घ्या जरा तुमची पुढं, समीक्षाच्या कारमागे लावलेल्या कारचा ड्रायव्हर खेकसला, ” येस येस जस्ट ए मिनिट, ऐक की हिमांशू आपण निघुया जाता जाता बोलू, गडबडीत समीक्षाने हिमांशूचं लगेज गाडीच्या बॅकसीट वर टाकून कार स्टार्ट केली.
एअरपोर्ट पासून समीक्षाच्या घरी जायला जवळपास दीड तासाचा रन होता, आणि हिमांशूचं घर तिथून पुढे अर्ध्या तासांवर होता. त्यातूनही हिमांशूला काही शॉपिंग करायची असल्याने समीक्षाने गाडी मॉलकडे वळवली, शॉपिंग नंतरचं लंच संपेपर्यंत जवळपास दुपारचे 3:45 वाजले होते, तिथून पुढे हिमांशूला घरी ड्रॉप करेपर्यंत 2 तास जाणार होते तरी, दोघे मस्त कॉलेजच्या आठवणींत बरेच रमून गेले होते त्यामुळे 2 तासांचा ट्राफिक रनही त्यांच्या गप्पांसाठी कमी पडला. “ऐक ना उद्या काय करतोयस? उद्या भेटुयात की. समीक्षाने उत्सुहकतेने विचारलं. “मी… उद्या एक लग्न अटेंड करतोय दुपारपर्यंत वगैरे होईन फ्री, का गं ?”, हिमांशू म्हणाला. “काही नाही रे एका महत्वाच्या मुद्द्यावर तुझ्याशी बोलायचं होतं, ऍक्च्युअली मी फोनवरच बोलणार होते पण म्हणलं काही गोष्टी या समोरासमोर भेटून बोललेल्या बऱ्या.” समीक्षा म्हणाली. ” डेफिनेटली शुअर व्हाय नॉट, साऊंड्स लाईक ए गुड आयडिया, फारसे आढेवेढे न घेता हिमांशूने विषयाला पूर्णविराम दिला. समीक्षाने हिमांशूबाबत ठरवल्याप्रमाणे सगळं आतापर्यंत घडत होतं, समीक्षा एक वेगळा डिसीजन घ्यायचा विचार करत होती, भले तो ग्रुप मधल्या बाकीच्यांना पचायला थोडा जड जाणार होता, पण समीक्षाच्या मते ती तिच्या जागी बरोबर होती. ती हिमांशूच्या येण्याने सुखावून गेली होती, इतकी भारावून गेली होती की, हिमांशू उद्या नक्की कोणतं लग्न अटेंड करणार आहे हे त्याला विचारायचं ती विसरली……
क्रमशः
® ऋषिकेश पंचवाडकर
CAUTION: Smoking or consuming Alchohol is injurious to the health
Other Social Links